नेरला येथील अक्षय मधु नान्हे हया दुचाकी चालकाला चारचाकी वाहनाने मागवून धडक दिल्याने मृत्यू.
शुक्रवार, 20 मार्च 2026
Comment
संजीव भांबोरे ्
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अड्याळ बाजार समितीच्या नाका परिसरात चार चाकी वाहन क्रमांक एम एच 32 वाय 14 64 च्या चालक आरोपी नामे अमृत राजाराम मंगल वय 33 राहणार बेलाटी यांनी दिनांक 19 मार्च 2026 ला रात्री 10.15 वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने गाडी चालवून दुचाकी वाहनाला मागवून धडक मारल्याने मृत पावला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की फिर्यादी रेवनात धोंडुजी नान्हे 53 यांचा पुतण्या मृतक नामे अक्षय मधु नान्हे वय अंदाजे 32 वर्षे राहणार नेरला यांचे मोटार सायकल क्रमांक 36 वाय ८८२८ हिचे मधील पेट्रोल संपल्याने नेरला कडून अड्याळ कडे रोडने आपली मोटरसायकल ढकलत ढकलत पायदळ येत असताना बाजार समिती नाक्याजवळ मागेहुन येणाऱ्या चार चाकी वाहन क्रमांक एम एच 32 वाय 14 64 हिच्या चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरगाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या पुतण्याला व मोटार सायकलला मागवून धडक मारल्याने फिर्यादीचा पुतण्या रोडवर खाली पडून त्याच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागला. त्यास उपचार कामी ग्रामीण रुग्णालय अड्याळ येथे भरती केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून त्यास मृत घोषित केले .तरी फिर्यादीचा पुतण्या अक्षय मधु नान्हे वय अंदाजे 32 वर्षे राहणार नेरला याच्या मरणास चारचाकी वाहन क्रमांक एम एच 32 वाय 14 64 च्या चालक आरोपी अमृत राजाराम मंगर कारणीभूत असल्याचे फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून तसेच ठाणेदार साहेब यांचे आदेशाने सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेण्यात आला .सदर चार चाकी आरोपी चालक अमृत राजाराम मंगर विरुद्ध कायमी अपराध क्रमांक 146 / 2026 कलम 281 ,106 भारतीय न्याय सह कलम 184 मो .वा .का.नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.. सदरचा गुन्हा पोलीस हवालदार मेश्राम 13 97 यांनी दाखल केला असून तपास अधिकारी म्हणून सहाय्यक फौजदार वामन मडावी/ 768 आहेत.
0 Response to "नेरला येथील अक्षय मधु नान्हे हया दुचाकी चालकाला चारचाकी वाहनाने मागवून धडक दिल्याने मृत्यू. "
एक टिप्पणी भेजें