रूम भाड्याच्या तगाद्यामुळे विद्यार्थिनीने दिला जीव.
मंगलवार, 10 मार्च 2026
Comment
साप्ता.जनता की आवाज"
वृत्तपत्र तिनिधी
नांदेड :- हडको परिसरातील पद्मश्री शामराव कदम होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात बीएचएमएसच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या २५ वर्षीय विद्यार्थिनीने खासगी वसतिगृहात गळफास घेऊन जीव दिल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी वसतिगृह चालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन घोगरे पाटील यांच्यावर अखेर अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाजेगाव येथील आकांक्षा मुंजाजी गायकवाड (वय २५) ही विद्यार्थिनी हडको येथील पद्मश्री शामराव कदम होमिओपॅथी महाविद्यालयात बीएचएमएसचे
शिक्षण घेत होती. ती जवळच असलेल्या खासगी वसतिगृहात राहत होती. शुक्रवारी सकाळी तिने वसतिगृहात गळफास घेऊन जीव दिला. घटनेनंतर कुटुंबीय व नातेवाईकांनी वसतिगृह चालक जीवन घोगरे पाटील यांनी घरभाड्यासाठी वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून भाडे थकले असल्याने मुलीवर दबाव टाकला जात होता, त्यामुळेच हा प्रकार घडल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता
0 Response to "रूम भाड्याच्या तगाद्यामुळे विद्यार्थिनीने दिला जीव."
एक टिप्पणी भेजें