-->
उल्हासनगरात धक्कादायक घटना : सफाई कामगाराची ऑन-ड्युटी हत्या; पत्नीची राहत्या घरी आत्महत्या.

उल्हासनगरात धक्कादायक घटना : सफाई कामगाराची ऑन-ड्युटी हत्या; पत्नीची राहत्या घरी आत्महत्या.



     सोनू संजीव क्षेत्रे
 साप्ता."जनता की आवाज" 

उल्हासनगर :- उल्हासनगर शहरात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. महापालिकेच्या कंत्राटी सफाई कामगाराची ऑन-ड्युटी हत्या करण्यात आली असून, या घटनेचा धक्का सहन न झाल्याने मृत कामगाराच्या पत्नीनेही आत्महत्या केल्याने शहरात शोककळा पसरली आहे.
मृत कामगाराचे नाव महादू जगताप (वय ३५) असे असून, आत्महत्या केलेल्या त्यांच्या पत्नीचे नाव पूर्वी महादू जगताप (वय ३२) असे आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी दुर्गेश गुप्ता (वय ३१) याला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महादू जगताप हे उल्हासनगर महापालिकेच्या कंत्राटावर काम करणाऱ्या कोणार्क कंपनीत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक ३ मधील सेक्शन २० परिसरातील बारेक क्रमांक ८९६ येथे घडली.
सकाळच्या सुमारास महादू जगताप हे नेहमीप्रमाणे साफसफाईचे काम करत असताना आरोपी दुर्गेश गुप्ता याने अचानक तीक्ष्ण हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने महादू जगताप यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हल्लेखोर दुर्गेश गुप्ता हा त्या वेळी नशेच्या अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तसेच यापूर्वीही आरोपी आणि महादू जगताप यांच्यात वाद झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
दरम्यान, पतीच्या हत्येची बातमी कळताच पत्नी पूर्वी जगताप यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या दुहेरी घटनेमुळे उल्हासनगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
महादू जगताप यांच्या पहिल्या पत्नीचा यापूर्वीच मृत्यू झाला होता आणि त्यांना दोन मुले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

0 Response to "उल्हासनगरात धक्कादायक घटना : सफाई कामगाराची ऑन-ड्युटी हत्या; पत्नीची राहत्या घरी आत्महत्या."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article