-->
जर्नलिस्ट मीडिया असोसिएशनची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर; संजय निराळे प्रदेशाध्यक्ष.

जर्नलिस्ट मीडिया असोसिएशनची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर; संजय निराळे प्रदेशाध्यक्ष.



हर्षवर्धन देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"

 मुंबई/नागपूर :- पत्रकारांची प्रतिनिधी संस्था जर्नलिस्ट मीडिया असोसिएशन (JMA) यांनी महाराष्ट्रातील नव्या राज्य कार्यकारिणीची घोषणा केली असून, २५ मार्च रोजी झालेल्या निवडणुकीत वरिष्ठ पत्रकार संजय निराळे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदी विनायक गुलगुळे, तर महासचिवपदी संजय पवार यांची नियुक्ती करण्यात आली.

राज्य सल्लागार म्हणून राजीव मोहन मिश्रा आणि सुचिता बिराजदार यांची निवड करण्यात आली असून, दत्तात्रय सूर्यवंशी यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. उपाध्यक्षपदी हेमंत भास्कर, लालचंद यादव, सनी मेहरोल आणि भोलानाथ शर्मा, सहकोषाध्यक्षपदी विकास पाटील व मो. इरशाद शेख, तर उपसचिवपदी मो. कमर शाह आणि ओमकार नागावकर यांची निवड करण्यात आली.

ही निवडणूक जेएमएचे राज्य प्रभारी सुधीर शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पॉलिसी एक्स्पर्ट

संजीव विश्वकर्मा आणि मुख्य सल्लागार राजीव मोहन मिश्रा यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची जबाबदारी सांभाळत प्रक्रिया निष्पक्ष व पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली.

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष संजय निराळे यांनी पत्रकारांच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकारांचे कल्याण, मदत आणि संघटन हेच ἃ चे प्रमुख ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राज्य प्रभारी सुधीर शर्मा, तसेच रिपाईचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष महेश खरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

नव्या कार्यकारिणीसमोर पत्रकारांची सुरक्षा, पेन्शन योजना आणि डिजिटल मीडियाला मान्यता मिळवून देणे ही महत्त्वाची आव्हाने असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. असंघटित पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी तसेच तत्त्वनिष्ठ पत्रकारितेला प्रोत्साहन देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

0 Response to "जर्नलिस्ट मीडिया असोसिएशनची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर; संजय निराळे प्रदेशाध्यक्ष."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article