-->
शांतीवन बुद्ध विहार समतेचे संदेश देणारे ठिकाण - डॉ बाळकृष्ण सार्वे.

शांतीवन बुद्ध विहार समतेचे संदेश देणारे ठिकाण - डॉ बाळकृष्ण सार्वे.



• धम्म मेळावा व 12 व्या वर्धापन दिनानिमित्त चिचाळ येथे मार्गदर्शन

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- पवनी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार चिचाळ येथे दोन दिवसीय धम्म मेळाव्याचे व १२ व्या वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात 27 व 28 फेब्रुवारी 2026 ला आले होते . मेळाव्याला मार्गदर्शन करताना डॉ बाळकृष्ण सार्वे अध्यक्ष भंडारा जिल्हा पतसंस्था संघ मार्गदर्शन करताना म्हणाले की शांतीवन बुद्ध विहार समतेचे संदेश देणारे छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,संत गाडगेबाबा ,डॉ बाबासाहेब आंबेडकर, सम्राट अशोक, तथागत गौतम बुद्ध , शिवली बोधी, अशोक स्तंभ,व निसर्ग रम्य वातावरण बघून भिंती बोलक्या असून समतेचा संदेश या विहारातून दिल्या जात आहे. हे विहार बघून प्रथमच मी बघून भारावून गेल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे उद्घाटक सदानंद इलमे मुख्य संयोजक संविधान संघर्ष समिती यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणीप्रमाणे या बुद्ध विहारातून समतेचा संदेश खऱ्या अर्थानं लोकांपर्यंत पोहचतो असे मत व्यक्त केले. यावेळी माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, रोशन जांभुळकर अध्यक्ष संविधान बचाव संघर्ष समिती भंडारा जिल्हा,, मिलिंद गोंडाने यांनी आपले विचार व्यक्त केले. सर्वप्रथम सर्व पाहुण्यांचे उपस्थितीत महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. वासेळा येथील महिलांनी लेझीम नृत्य सादर करून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.मिलिंद गोंडाणे यांनी शांतीवन विहाराकरता थंड पाण्याचे आरो मशीन देण्यात आले. त्याचप्रमाणे चिचाळ परिसरातील मेरिटमध्ये येणाऱ्या प्रथम मुलाला 10,000 हजार रुपये देण्याची घोषणा सुद्धा त्यांनी वर्धापन दिनी केली. यावेळी प्रामुख्याने शांतीवन बुद्ध विहाराचे संचालक जीवन बोधि बौद्ध ,शांतीवन बुद्ध विहाराचे अध्यक्ष धम्मरक्षित मेश्राम,सदानंद धारगावे, रामराव गाडेकर, उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन पत्रकार संजीव भांबोरे यांनी केले तर प्रास्ताविक विनय ढोके यांनी तर आभार एडवोकेट मुकेश मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी करण्या करिता अश्विन मेश्राम, प्रणय रामटेके , सुरेश उके,विनोद डोंगरे, प्रशांत बडोले, गंगाधर गजभिये ,आशिष मेश्राम, प्रशांत कांबळे, दीपक वालदे ,रेखा सुखदेवे, सत्यशीला बौद्ध, लता भांबोरे, प्रणाली मेश्राम, राजकुमार वाहने , यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमात मोठ्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होते. यावेळी बौद्ध संमेलनानिमित्त येणाऱ्या पर्यटकांची दोन दिवस जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. विनयबोधी महाथेरो व भिक्खू संघ यांच्या उपस्थितीत महापवित्रन पाठ करून धम्मदेशना बौद्ध उपासक,उपासिका यांना देण्यात आली.

0 Response to "शांतीवन बुद्ध विहार समतेचे संदेश देणारे ठिकाण - डॉ बाळकृष्ण सार्वे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article