-->
वादळी वेदनेचा विद्रोही महाकवी ‘इलेक्ट्रिक मॅन’ अभय डी. रंगारी यांना प्रबोधिनी "स्टार" पुरस्कार प्रदान.

वादळी वेदनेचा विद्रोही महाकवी ‘इलेक्ट्रिक मॅन’ अभय डी. रंगारी यांना प्रबोधिनी "स्टार" पुरस्कार प्रदान.



• प्रबोधिनी न्युज आणि प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूहाकडून सन्मान

• विरोधकांच्या बदनामी ला प्रबोधनाच्या कृतीतून चपराक देऊन युवकांच्या ह्रदयातील बनले स्टार.

दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पत्रकारिता, पर्यावरणीय व साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, लेखक व मुक्त पत्रकार इलेक्ट्रिक मॅन अभय देवाजी रंगारी यांना त्यांच्या प्रबोधनात्मक आणि समाजपरिवर्तनाच्या कार्याबद्दल प्रबोधिनी न्यूज व प्रबोधिनी मंच महाराष्ट्र साहित्य समूह यांच्या वतीने “प्रबोधिनी स्टार पुरस्कार” त्यात सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल , मा. प्रणितीताई करमळकर नागपूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

अभय रंगारी यांनी जल जगलं जमीनीच्या संरक्षणा साठी व अन्याय, शोषण, विस्थापन आणि अंधश्रद्धेविरोधात सातत्याने आवाज उठवत जनतेच्या न्याय व हक्कांसाठी जनसामान्यांनाचा असामान्य बुलंद आवाज म्हणून नेतृत्व केले आहे. विरोधकांकडून बदनामी व मानसिक खच्चीकरणाचे प्रयत्न झाले तरी त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून प्रबोधन आणि व्यवस्था परिवर्तनाचा मार्ग अवलंबला. युवकांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करून सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.

संविधानिक विचारधारा आणि प्रबोधन कार्य

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानिक विचारसरणीवर दृढ विश्वास ठेवत अभय रंगारी यांनी समानता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय व धर्मनिरपेक्षता या मूल्यांचा प्रचार-प्रसार केला. मतदान जनजागृती, संविधान सन्मान अभियान, मूलभूत कर्तव्यांची जाणीव, अंधश्रद्धा निर्मूलन आणि शिक्षणाद्वारे सामाजिक प्रबोधन हे त्यांच्या कार्याचे प्रमुख केंद्रबिंदू राहिले आहेत.

“जिथे जनता प्रामाणिक नाही, तिथे नेते आणि अधिकारी प्रामाणिक कसे मिळणार?” असा थेट सवाल करत त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती केली आहे. लाच देणारे थांबले तर लाच घेणारे आपोआप थांबतील, भ्रष्ट जनता भ्रष्ट नेता निवडणार नाही तर भ्रष्टाचारालाही आळा बसेल, अशी त्यांची ठाम भूमिका आहे.

राजकीय धाडस आणि प्रेरणादायी निर्णय

स्टॅम्प पेपरवर निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या त्यांच्या धाडसी निर्णयाची चर्चा राज्यभर झाली होती. या संकल्पनेवर आधारित दृश्य दक्षिण भारतीय चित्रपट Game Changer मध्येही प्रसंग दाखवण्यात आल्याचे सांगितले जाते. हा निर्णय भारतीय राजकीय इतिहासातील प्रेरणादायी पाऊल मानला जात आहे.

संघटनात्मक जबाबदारी

अभय रंगारी सध्या राष्ट्रीय किसान मोर्चा, भंडारा जिल्हा संयोजक म्हणून कार्यरत असून शेतकरी, वंचित व सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर सक्रिय नेतृत्व करत आहेत. प्रस्थापित व्यवस्थेविरोधात विस्थापितांना एकत्र करून जनतेच्या न्याय व हक्कासाठी संपूर्ण प्रकृतीत आपल्या नेतृत्वाच्या तेजाने जनतेला आपलेसे करणारे कुशल संघटक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये

“आदमी देखकर आदमी की पहचान करने वाला आदमी”, जनसामान्यांचा असामान्य बुलंद आवाज, वादळी वेदनेचा विद्रोही महाकवी, कुशल नेतृत्व व जननायक लोक गौरव, प्रजासत्ताक गौरव अशी त्यांची ओळख जनमानसात आहे. साहित्य, लेखन, सामाजिक विश्लेषण आणि पत्रकारितेद्वारे त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.

प्राप्त प्रमुख पुरस्कार

अभय रंगारी यांना यापूर्वी विविध मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत –

1. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे समाजसेवक पुरस्कार (निवड) – संभाजीनगर


2. कुशल नेतृत्व जननायक लोकगौरव पुरस्कार – मुंबई


3. गोल्डन पिकॉक अवॉर्ड – मुंबई


4. मानवाधिकार पुरस्कार – अहिल्यानगर


5. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय विचार प्रेरणा पुरस्कार – कोल्हापूर


6. जीवनगौरव पुरस्कार – पवनी, भंडारा


7. ग्लोबल स्टार पुरस्कार (निवड)


8. प्रजासत्ताक गौरव-मानवसेवा पुरस्कार



या सर्व कार्याची दखल घेत प्रदान करण्यात आलेला “प्रबोधिनी स्टार पुरस्कार” हा त्यांच्या समाजपरिवर्तनाच्या अखंड प्रवासातील आणखी एक मानाचा तुरा ठरला आहे.

सामाजिक बांधिलकी, प्रखर विचारसरणी आणि कृतीप्रधान नेतृत्वाच्या बळावर अभय डी. रंगारी यांनी भंडारा जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख निर्माण केली असून त्यांचे कार्य युवकांसाठी प्रेरणादायी मानले जात आहे.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्याबरोबरच अभय डी रंगारी च्या जीवनप्रवासावरील चित्रपटाची अभय चे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत

0 Response to "वादळी वेदनेचा विद्रोही महाकवी ‘इलेक्ट्रिक मॅन’ अभय डी. रंगारी यांना प्रबोधिनी "स्टार" पुरस्कार प्रदान."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article