-->
मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार - मुख्यमंत्री.

मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार - मुख्यमंत्री.




"साप्ताहिक जनता की आवाज"
 न्युज नेटवर्क 

मुंबई :- लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या टप्पा २ च्या भूमिपूजनामुळे मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक आणि दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत.

परिणामी, रुग्णालयातील खाट संख्या १९०० वरून थेट ३,२८६ होणार आहे. रुग्णालयात मुख्य इमारत, कर्करोग, आपत्कालीन सेवा व बाह्यरुग्ण विभाग उभारले जाणार आहेत. यासाठी २५०० कोटी खर्च होणार असून २०३० पर्यंत बांधकाम पूर्ण होणार आहे. राज्य शासन व मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मुंबईतील प्रत्येक नागरिकाला मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा संकल्प असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले

महानगरपालिकेच्या शीव येथील लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय पुनर्विकास टप्पा २ रुग्णालय इमारतीच्या सोहळ्याप्रसंगी भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. या रुग्णालयाची सुरुवात १९४७ मध्ये केवळ ६० खाटांपासून झाली होती. आज हे रुग्णालय सुमारे १९०० खाटांपर्यंत पोहोचले असून, विस्तारानंतर ही क्षमता ३,२८६ खाटांपर्यंत वाढणार आहे.
आशियातील मोठ्या ट्रॉमा केअर सेंटरपैकी एक, तसेच ह्युमन मिल्क बैंक आणि भाजलेल्या रूग्णांकरिता स्किन बँकसारख्या सुविधा असलेले हे रुग्णालय आधीच विशेष मानले जाते. सध्याच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णालय व्यवस्थेवर ताण असल्याने आधुनिकीकरण रुग्णालयाचे आणि विस्तार अत्यावश्यक होता, असे फडणवीस म्हणाले. या प्रकल्पासाठी सुमारे २,५०० कोटी

असून, यात २५ मजली निवासी टॉवर (डॉक्टर व नर्सेससाठी), १३ मजली कॅन्सर केअर सुविधा, १५ मजली मुख्य रुग्णालय इमारत, १४ मजली आपत्कालीन विभाग, १३ मजली बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि ४० हून अधिक ऑपरेशन थिएटर्सचा समावेश असेल, अशी माहिती त्यांनी दिली. एमआरआय, सीटी स्कॅनसह अत्याधुनिक निदान सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. भविष्यात आरोग्य सेवेमध्ये तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल आणि या रुग्णालयात आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महात्मा फुले जन आरोग्य योजनांच्या माध्यमातून नागरिकांना ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार दिले जात आहेत. सुमारे २,४०० आजारांवर मोफत उपचार उपलब्ध असून ४,५०० रुग्णालये या योजनांमध्ये सहभागी आहोत.

0 Response to "मुंबईसह राज्यातील नागरिकांना आधुनिक दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार - मुख्यमंत्री."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article