-->
रिपाई आठवले गटाच्या वतीने बुलढाणा रापचे विभागीय वाहतूक अधिकारी डिगांबर जाधव यांचा सत्कार.

रिपाई आठवले गटाच्या वतीने बुलढाणा रापचे विभागीय वाहतूक अधिकारी डिगांबर जाधव यांचा सत्कार.



जीतेंद्र गाडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
 वुत्तपत्र प्रतिनिधी

बुलढाणा :- मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्या मधील ग्राम सोनोशी

तालुका सिंदखेड राजाचे भूमीपूत्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बुलढाणा विभागाचे विभागीय - वाहतूक अधिकारी (डिटीओ) - आदर्श प्रशासक डिंगाबर मंजाराम जाधव हे शिस्त प्रिय व्यक्तीमत्व असून अत्यंत हलाखीतच्या - परिस्थितीतून ज्या आडवळणी गाव असलेले जेथे कशाचीच सोय नाही त्या ग्राम सोनोशी या खेडेगावातून - फुले, शाहू, आंबेडकर यांचे - विचार घरात असल्यामुळे शिक्षण - हे वाघीनीचे दुध्द आहे जो पीईल - तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही - हा विचार समोर ठेवून वडिलांनी - आपल्या तुटपुंज्या हलाखीच्या - परिस्थितीत आपल्या मुलाला शिक्षण दिले. जिथे शिक्षणाची - सोय नाही त्या ग्रामीण भागात - शिक्षण घेऊन परिस्थितीवर मात करून जिद्द आणि चिकाटीच्या - जोरावर ग्रामीण भागात शिक्षण - घेऊन पूढील उच्च शिक्षण - संभाजीनगर (औरंगाबाद) येथे - वस्तीगृहात राहून एम.ए.एमएड. ए.ए. एकॉनॉमिक्स ही उच्च पदवी

संपादन केली व एमपी एससीची तयारी करून पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली आणि लोकसेवा आयोगा मार्फत राज्यपरिवहन महामंडळात आगार व्यवस्थापक म्हणून पहीली सुरूवात जालणा जिल्ह्यातील परतूर आगारात आगार व्यवस्थापक म्हणून रूजू झाले त्या ठीकाणी 6 वर्षे चांगली सेवा केली व त्या चांगल्या कामाची पावती म्हणून राप प्रशासनाने जालना राप विभागात वाहतूक अधिकारी (डिटीओ) म्हणून पद्दोन्नती दिली. त्याठिकाणी 3 वर्षे सेवा केली व ते आज बुलढाणा राप विगागात वाहतूक अधिकारी (डिटीओ) म्हणून रूजू

एसटी

महाराष्ट्र साय परिवहन जय महाराष्ट्र

झाले अशा या आदर्श व होतकरू जिल्ह्याचा एक स्वाभिमान अभिमान म्हणून त्या भूमीपूत्राचा सन्मान व सत्कार व्हावा हा उद्देश समोर ठेवून बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव, भिमरत्न पुरस्कार प्राप्त समाजभूषण ज्येष्ठ नेते प्रा. इंजि. भैयासाहेब पाटील, रिपाई जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब सरदार, रिपाइं जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा प्रमुख नबाब मिर्झा बेग, जिल्हा कार्यध्यक्ष प्रा. पठाण सर, महीला जिल्हाध्यक्ष वंदनाताई वाघ, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिलीप काकडे सर,

जिल्हा संघटक संपर्क प्रमुख इंजि. शरद खरात, जिल्हा युवाध्यक्ष प्रकाश पाटील (म्हस्के), विदर्भमहीलाउपाध्यक्षा आशाताई वानखडे, तालुकाध्यक्ष बुलडाणा केशवराव सरकटे, मोताळा बाळासाहेब आहीरे, हीम्मतराव जाधव चिखली, भानुदास शेजूळ सिं.राजा, बुलढाणा तालुकाउपाध्यक्ष इंजि. भास्करराव जाधव, आल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाउपाध्यक्ष सैय्यद नाजीम, जिल्हा महासचिव विजय साबळे, पत्रकार विजय भालमोडे सिं. राजा इत्यादीनी या राप विभागाचे विभागीय वाहतूक अधिकारी श्री. डिगांबर जाधव साहेब यांचा शाल पुष्प देऊन त्यांच्या शासकीय रापच्या कार्यालयात यथोचित सत्कार केला व त्यांना पूढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या घरच्या हाल्लाखीच्या परिस्थितीवर चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर यश संपादन केले. हा त्यांचा आदर्श नविन पीढीने घेण्यासारखा आहे यश संपादन करावयाचे असेल तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर कोणतेही यश संपादन करता येते हे त्यांनी स्वतः दाखवून दिले.

0 Response to "रिपाई आठवले गटाच्या वतीने बुलढाणा रापचे विभागीय वाहतूक अधिकारी डिगांबर जाधव यांचा सत्कार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article