भंडाऱ्यातील लाखांदुरात ११ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार.
शनिवार, 28 मार्च 2026
Comment
• उपसभापती डॉ. नीलम गोहे यांची गंभीर दखल.
सोनु क्षेत्रे/दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
मुंबई./नागपूर :- दि.२८ भंडारा जिल्ह्यातील लाखांदुर तालुक्यातील मौजे पिंपळगाव (कोहळी) येथे ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय आणि खेदजनक आहे. या प्रकरणात आरोपीला कडक शिक्षा करण्यात यावी,
अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्ह यांनी केली आहे. याबाबत त्यांनी भंडारा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांना निवेदन दिले आहे. निवेदनात डॉ. गोहे यांनी म्हटले आहे की, पीडित मुलीच्या पुनर्वसनासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. तिला मनोधैर्य योजनेचा लाभतातडीने मिळवून द्यावा, जेणेकरून तिच्या मानसिक व शारीरिक पुनर्वसनास मदत होईल. दरम्यान, महिला व बाल विकास तालुका अधिकारी यांच्याशी दि.२८ मार्च रोजी, दुपारी १ च्या सुमारास उपसभापती कार्यालयाने संपर्क साधला असता त्यांना या घटनेची माहिती नसल्याचे समोर आले असून सदर मुलीला समुपदेशन व आवश्यक मदत मिळाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी लाखांदुर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे. आरोपीविरुद्ध कठोर कारवाई व्हावी तसेच पीडितेला न्याय मिळावा, यासाठी डॉ. नीलम गोऱ्ह यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे.
0 Response to "भंडाऱ्यातील लाखांदुरात ११ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार."
एक टिप्पणी भेजें