-->
पीडित अल्पवयीन मुलीस न्याय मिळण्याकरिता निवेदन.

पीडित अल्पवयीन मुलीस न्याय मिळण्याकरिता निवेदन.


• पुढाकार घेत महिला अधिकार सामाजिक संघटनेचे तहसीलदार व पोलिस ठाण्यात निवेदन.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

लाखांदूर :- मौजा पिंपळगाव (कोहळी) येथे अल्पवयीन मुलीसोबत घडलेल्या

गंभीर प्रकाराच्या पार्श्वभूमीवर पुढाकार घेत महिला अधिकार सामाजिक संघटनेने पीडित मुलीस न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका घेत तहसीलदार लाखांदूर तसेच लाखांदूर पोलिस ठाण्यात निवेदन सादर केले. हे निवेदन संघटनेच्या विदर्भ कार्याध्यक्ष निरुताई भारत मेश्राम व पूर्व विदर्भ अध्यक्ष ज्योतीताई बाबा रामटेके यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील तीन अल्पवयीन मुलींना चारचाकी गाडीतून फिरवून आणण्याच्या बहाण्याने जंगल परिसरात नेण्यात आल्याचा आरोप आहे. त्यापैकी एका मुलीसोबत अश्लील कृत्य करण्यात आल्याचा तसेच इतर दोन मुलींना हा प्रकार कोणालाही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांनी पीडित मुलीने हा प्रकार आई-वडिलांना सांगितल्यानंतर लाखांदूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणात आरोपीवर तात्काळ व कठोर कारवाई

पोलीस ठाणे, लाखांदूर करण्यात यावी, तसेच सखोल चौकशी करून आरोपीला कायद्याच्या पळवाटा वापरून सुटू दिले जाऊ नये, अशी ठाम मागणी महिला अधिकार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच न्यायालयात भक्कम आरोपपत्र सादर करून पीडित अल्पवयीन मुलीस लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महिला अधिकार सामाजिक संघटनेच्या वतीने हे निवेदन

लाखांदूर पोलिस ठाणेदार तसेच तहसीलदार लाखांदूर यांना देण्यात आले. यावेळी निरुताई भारत मेश्राम (विदर्भ कार्याध्यक्ष) यांच्या नेतृत्वाखाली ज्योतीताई बाबा रामटेके (पूर्व विदर्भअध्यक्ष), बिंदूताई रामटेके (भंडारा जिल्हा महासचिव), अर्पणाताई जांगडे (भंडारा जिल्हा उपाध्यक्ष), निशाताई बघमारे (नगरसेविका लाखांदूर), जयश्रीताई शेंडे, वर्षाताई कोरे, सविताताई लेदे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

0 Response to "पीडित अल्पवयीन मुलीस न्याय मिळण्याकरिता निवेदन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article