-->
थोरात बनावट प्रमाणपत्रांची रॅकेट.

थोरात बनावट प्रमाणपत्रांची रॅकेट.

• पोलिसात तक्रार, नागरिकांचे कारवाईकडे लक्ष.


"साप्ताहिक जनता की आवाज" वुत्तपत्र प्रतिनिधी 

 भंडार :- जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पोहरा या मोठ्या ग्रामपंचा-यतच्या गोल व सचिवाचे बनावट रबरी शिक्याच्या व व बनावट सहीच्या वापर करून आपला फायदा करून घेण्यासाठी जनतेची, प्रशासनाची दिशाभूल करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन पोलिसात तक्रार दाखल करून तसेच गटविकास अधिकारी, तहसीलदार लाखनी, आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा यांना माहितीस्तव कळविले असून प्रशासक रामलाल पाटणकर यांनीतात्काळ पत्र परिषद घेऊन जनतेने आणि प्रशासनाने सतर्क राहण्याचे पत्र परिषदेतन आवाहन केले.

याबाबत याबाबत सविस्तर असे

की, खापरी येथील रहिवाशी गीता दशरथ कावडकर यांनी मीरा धुर्मेंद्र भोंगाडे यांचे मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यासाठी 6 मार्च 2026 ला अर्ज सादर केला व त्यासोबत त्यांचेकडे असलेले पूर्वीचे मृत्यू प्रमाण-पत्राची माहितीसाठी छायांकित प्रत जोडली. मात्र रेकॉर्ड पडताळणी केली

असता ती नोंदच आढळून आली नाही. तसेच मोतीलाल ओसवाल, भंडारा. यांनी होम लोन करिता आलेल्या मागणीसाठी मालमत्ता क्रमांक 334 चे जोडलेल्या प्रमाणपत्राची पडताळणी संबंधाने दिनांक 9 मार्च 2026 रोजी आलेल्या प्रमाण पत्राची पडताळणी केली असता. या प्रमा

णपत्रावर वापरण्यात आलेले रबरी शिक्के आणि सही सुद्धा बनावट असल्याचे पडताळणी अंति निदर्शनास आल्याने ग्रामपंचायत चे प्रशासक आणि ग्रामपं-चायत अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन पोलीस स्टेशन लाखनी येथे तक्रार दाखल केली. व तक्रारींची प्रत गटविकास अधिकारी, तहसीलदार लाखनी, आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी, भंडारा. यांना माहितीस्तव कळविले आहे. तसेच नागरिकांना आणि प्रशासनाला तात्काळ माहिती होण्याचे दृष्टीने व चौकशी अंती दोषी आढळणारावर तात्काळ ठोस कारवाई करण्याची पत्रपरिषदेतून मागणी केली आहे.

त्यामुळे आता बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्या रॅकेटचा शोध लावण्याचे आव्हान लाखनी पोलिसांवर आहे.

0 Response to "थोरात बनावट प्रमाणपत्रांची रॅकेट."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article