लाखनी तालुक्यात कर वसुली पथके तयार.
शनिवार, 7 मार्च 2026
Comment
नरेंद्र मेश्राम
साप्ता."जनता की आवाज"
लाखनी :- तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीची कर वसुली शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने पंचायत समिती लाखनीकडून विशेष कर वसुली पथकाची स्थापना केली असून सर्व थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पंचायत समिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तालुक्यातील ग्राम पंचायत निहाय कर वसुली पथके तयार करून वसुली करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर विविध कराची मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने विकास कामावर त्याचा थेट परिणाम होत आहे. त्यामुळे पंचायत समितीने
सन २५-२६ वर्षाची कर वसुली शंभर टक्के होण्याच्या दृष्टीने विशेष पथक तयार केलेले आहे. या मोहिमेत ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी, विस्तार अधिकारी, सरपंच, सदस्य यांच्या माध्यमातून थकित कराची वसुली केली जाणार आहे. थकबाकी असलेल्यांनी वेळेवर कर न भरल्यास त्यांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व कर थकबाकीदारांनी वसुली पथकास वसुली देऊन सहकार्य करण्याचे आवाहन साहाय्यक गटविकास अधिकारी के. डी. टेंभरे यांनी केले आहे.
0 Response to "लाखनी तालुक्यात कर वसुली पथके तयार."
एक टिप्पणी भेजें