-->
सद्गुरु जोग महाराज गुरुकुल निमगाव( पहेला) येथे आरोग्य निदान, मोफत औषधी वितरण व समुपदेशन कार्यक्रम संपन्न.

सद्गुरु जोग महाराज गुरुकुल निमगाव( पहेला) येथे आरोग्य निदान, मोफत औषधी वितरण व समुपदेशन कार्यक्रम संपन्न.



संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जानता की आवाज"
 
भंडारा :- तालुक्यातील सद्गुरु जोग महाराज गुरुकुल निमगाव( पहेला)येथे दिनांक 29 मार्च 2026 ला आरोग्य निदान ,मोफत औषधी वितरण व समुपदेशन कार्यक्रम घेण्यात आले. आरोग्य तपासणी करण्यापूर्वी डॉ. संजय मानकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक आरोग्य व सांघिक आरोग्याबद्दल विस्तृत सोप्या भाषेत मार्गदर्शन केले .याशिवाय सेवांकुर नागपूर या संस्थेच्या सदस्यांना प्रशिक्षणार्थी डॉ. संजय मानकर यांनी मार्गदर्शन केले. सदर शिबिर ह.भ. प. ओमदेवजी चौधरी महाराज यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आले. औषधी वितरण रविभाऊ, रेवानाथ यांनी केले. रुग्णांची नोंदणी सागर यांनी केली .सेवांकुर संस्थेचे डॉ. मयूर आडे ,डॉ.हटवार व इतर विद्यार्थ्यांनी सहकार्य केले .डॉ.संजय मानकर यांनी विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दैनंदिनी लेखन, पुरेशी 6 ते 7तास झोप, योगासन, ज्ञानसाधना, नियमित व्यायाम ,नियमित अभ्यास ,आहार विहार ,ऋतूनुसार फळे व भाज्या खाणे ,कोमट पाणी पिणे ,इत्यादी बद्दल मार्गदर्शन केले. गुरुकुलातील पोषण आहार तयार करणाऱ्या भगिनी सेवेकरी यांचे सुद्धा आरोग्य परीक्षण करून त्यांना मोफत औषधी वितरण करण्यात आली सर्व रुग्णांना खाऊ वाटप करण्यात आले शेवटी शशिकांत हजारे यांनी सर्वांची आभार मानले संपूर्ण शिबीरांनादायक वातावरणात पार पडले समाज जागृती प्रतिष्ठान व सेवांकुर संस्थेचे हरिभक्त परायण नामदेवजी चौधरी महाराज यांनी आभार मानले उपरोक्त संस्थेने दरवर्षी आरोग्य शिबिर घेण्याचे ठरविणे सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या . सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सौ .सीमाताई ओमदेव चौधरी व इतर भगिनींनी फार मोलाचे सहकार्य केले .कार्यक्रमाचे आभार संजय एकापुरे यांनी मानले.

0 Response to "सद्गुरु जोग महाराज गुरुकुल निमगाव( पहेला) येथे आरोग्य निदान, मोफत औषधी वितरण व समुपदेशन कार्यक्रम संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article