-->
कडुलिंबाच्या झाडाला फाशी घेत शेतकऱ्याची आत्महत्या!.

कडुलिंबाच्या झाडाला फाशी घेत शेतकऱ्याची आत्महत्या!.




• लोहारा येथील घटना, मंगळवारला सकाळी झाली उघड.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

पालांदूर :- दारू पिऊन शेतात जात असताना घरच्या लोकांनी हटकले असता जिद्दीने शेतात निघून गेला व रात्र होऊन घरी परत आला नसल्याने शोध घेतला असता स्वतःच्या शेतात कडुलिंबाच्या झाडाला ताराने फाशी लागून लटकून मरण पावला. ही घटना मंगळवारला(३ मार्च)सकाळी ७:३० वाजे दरम्यान उघडकीस आली. योगेश देवाजी मेंढे (५२) राहणार लोहारा तालुका लाखनी असे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे नाव आहे. 

होळीच्या दिवशी २ मार्च सोमवारला रात्री दरम्यान योगेश दारू पिऊन असल्याने घरच्या सदस्यांनी त्याला हटकले. मात्र तो सनकी स्वभावाचा असल्याने तो निघून गेला. घरच्यांना त्याच्या स्वभावाची जाण असल्यामुळे तेवढे त्यांनी मनावर घेतले नाही. मात्र सकाळी योगेशचा मुलगा शैलेश शेताकडे गेला असता कडुलिंबाच्या झाडाला वडिलांचे प्रेत लटकलेल्या अवस्थेत दिसले. त्यांनी लगेच पोलीस विभागाला सूचना दिली. पोलिसांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला. पार्थिव शवविच्छेदन करून कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. अंतविधी आटोपली. त्याच्या मागे पत्नी, वडील, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. त्याला तीन एकर शेती आहे. पालांदूर पोलिसांनी मर्ग दाखल केला. 
फोटो: मृतक योगेश मेंढे

0 Response to "कडुलिंबाच्या झाडाला फाशी घेत शेतकऱ्याची आत्महत्या!."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article