-->
ट्रॅक्टर दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार!.

ट्रॅक्टर दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार!.



• ट्रॅक्टरचे कॅजव्हिल् ठरले धोकादायक 

• मंगळवार सकाळी ९:३० ची पळसगाव विहीरगाव मार्गावर घटना.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
पालांदूर :- सकाळी शेताकडे दुचाकीने जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरने आमोरासमोर धडक देत ट्रॅक्टरच्या लोखंडी चाकाला दुचाकीस्वार आदळला. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार ३ मार्चला सकाळी ९:३० वाजे पळसगाव विहीरगाव मार्गावर घडली. मंगेश सुखदेव बांगरे (३२) राहणार पळसगाव तालुका लाखनी असे त्याचे नाव आहे. 
फोटो: मृतक मंगेश सुखदेव बांगरे 

माहितीनुसार, मृतक मंगेश दुचाकी क्रमांक एम एच ३६ ए क्यू ९०२० ने सोबत्याला घेऊन शेताकडे निघाला होता. तर विरुद्ध दिशेने महिंद्रा कंपनीच्या ट्रॅक्टर एम एच ३६ ए जी ४०२८ चा चालक भरधाववेगाने ,निष्काळजीपणाने, लापरवाहिनी चालवून दुचाकीला अपघातास कारणीभूत ठरला. ट्रॅक्टर चालक याच्यावर पालांदूर पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली.

0 Response to "ट्रॅक्टर दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार ठार!. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article