-->
११ लाख कोटींच्या कर्जाखाली महाराष्ट्र; शेतकरी मात्र वाऱ्यावर - 'छत छिनकर कंबल दान' सारखा अर्थसंकल्प!..

११ लाख कोटींच्या कर्जाखाली महाराष्ट्र; शेतकरी मात्र वाऱ्यावर - 'छत छिनकर कंबल दान' सारखा अर्थसंकल्प!..



दिगंबर देशभ्रतार 
साप्ता."जनता की आवाज" 

भंडारा :-महाराष्ट्रावर सुमारे १११ लाख कोटींचे कर्ज होण्याची शक्यता व्यक्त होत असताना राज्याच्या आर्थिक धोरणांवर तीव्र टीका होत आहे. राष्ट्रीय किसान मोर्चाचे कार्यकर्ते 'इलेक्ट्रिक मॅन' अभय डी. रंगारी यांनी सरकारच्या धोरणांवर जोरदार प्रहार करत हा अर्थसंकल्प म्हणजे "छत छिनकर कंबल दान करणारा अर्थसंकल्प" असल्याचे म्हटले आहे.

रंगारी यांच्या मते, निवडणुकीत दिलेली अनेक आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नाहीत. लोककल्याणकारी योजना आणि वाढीव लाभकागदावरच असल्याचे दिसून येत असून "बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी" अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्याचा महसुली तुटवडा वाढत असताना खर्चही वाढत आहे, त्यामुळे भविष्यात मोठा आर्थिक दबाव येण्याची शक्यता असून त्यावर ठोस उपाययोजना दिसत नसल्याचे ते म्हणाले. कर्जमाफी योजना असली तरी कठोर अटींमुळे अनेक लहान व मध्यम शेतकरी त्यापासून वंचित राहत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

राष्ट्रीय किसान मोर्चाचे 'इलेक्ट्रिक मॅन' अभय डी. रंगारी यांचा सरकारवर जोरदार हल्ला!

याशिवाय शेती उत्पादनासाठी स्थिर आणि योग्य हमीभावाबाबत स्पष्ट धोरण नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. महाराष्ट्रात दुष्काळाचा प्रश्न गंभीर असतानाही सिंचन प्रकल्पांसाठी अपेक्षित निधी कमी असल्याची टीका त्यांनी केली. बियाणे, खत, कीटकनाशके, वीज व डिझेल यांच्या वाढत्या दरांमुळे शेतीचा खर्च वाढत असून त्यावर नियंत्रणासाठी ठोस निर्णय नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी त्वरित आणि पुरेशी भरपाई देणारी मजबूत कायदेशीर व्यवस्था आवश्यक असल्याचे सांगत रंगारी यांनी सरकारवर शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला. तसेच कोल्ड स्टोरेज, प्रक्रिया उद्योग, बाजारपेठ आणि शेतीमाल साठवण सुविधा वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर योजना राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

घरकुल योजनेसारखी "गोदाम योजना" सुरू करून शेतकऱ्यांना माल साठवण्याची सुविधा दिल्यास योग्य भाव मिळेपर्यंत माल सुरक्षित ठेवता येईल, असेही त्यांनी सुचवले.

एकंदरीत, सध्याचा अर्थसंकल्प हा शेतकरी व ग्रामीण अर्थव्यवस्थेला दिलासा देण्याऐवजी आर्थिक भार वाढवणारा असल्याचा आरोप करत सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी मागणी इलेक्ट्रिक मॅन अभय डी. रंगारी यांनी केली आहे.

0 Response to "११ लाख कोटींच्या कर्जाखाली महाराष्ट्र; शेतकरी मात्र वाऱ्यावर - 'छत छिनकर कंबल दान' सारखा अर्थसंकल्प!.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article