ओबीसी समाजाची जातनिहाय गणना करा.
गुरुवार, 5 मार्च 2026
Comment
• अन्यथा 22 मार्चला भंडारा जाम करू ओबीसी नेत्यांचे धरणे आंदोलनात आवाहन
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- आज दिनांक ५ मार्च 2026 ला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी संघर्ष समिती जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्या धरणे आंदोलनात ओबीसीच्या सर्वच नेत्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की , ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना न केल्यास 22 मार्च 2026 ला भंडाऱ्याला चारही बाजूने जाम करू असा इशारा देण्यात आला. ज्याप्रमाणे केंद्र सरकार अनुसूचित जाती ,जमातीची ,जनगणना करीत आहे ,त्याच्आधारे ओबीसी समाजाची सुद्धा जातनिहाय गणना करण्यात यावी. केंद्र सरकारच्या राजमुद्रेत ओबीसी समाजाची जात निहाय गणनेतस्वतंत्र कालम नसल्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार आहे . याचा दुष्परिणाम ओबीसी समाजाच्या मुलांचे शिक्षण, नोकरी ,शिष्यवृत्तीचा प्रश्न, वस्तीगृहाच्या प्रश्न ,निधीचा प्रश्न आवर गदा येणार आहे. म्हणून केंद्र शासनाने तात्काल,राजपत्रामध्ये सुधारणा करून ओबीसी समाजाला न्याय देण्यात यावा .अन्यथा 22 मार्चला जिल्हाधिकारी भंडारा कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मार्गदर्शन करताना ओबीसी नेत्यांनी सांगितले. व कमी जास्त झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल असे सुद्धा ते म्हणाले. यावेळी ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुरमु भारत सरकार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मृत्युंजय कुमार नारायण महानियंत्रक आणि जनगणना आयुक्त भारत सरकार ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांना निवेदन देण्यात आले .निवेदन देताना सदानंद ईलमे मुख्य समन्वयक, प्रभाकर वैरागडे मुख्य समन्वय ,रमेश सहारे कोषाध्यक्ष, संजय मते संघटक, डॉ. बाळकृष्ण सार्वे प्रसिद्धी प्रमुख, रोशन उरकुडे निमंत्रक,ललिता देशमुख अध्यक्ष, वृंदा गायधनी कार्याध्यक्ष, दत्ता बोरकर कोषाध्यक्ष, भावना निकुडे उपाध्यक्ष ,सुनंदा झंजाड सरचिटणीस ,भगीरथ धोटे अध्यक्ष, उमेश कोराम मुख्य संयोजक, गोपाल सेलोकर अध्यक्ष ओबीसी सेवा संघ भंडारा, उमेश सिंगनजुडे , उमाजी देशमुख , रोशन जांभुळकर अध्यक्ष भंडारा जिल्हा संविधान बचाव संघर्ष समिती, ओबीसी नेते दिलीप ढगे, ग्यानचंद जांभुळकर, राजेश मडामे, श्यामला कोहपरे ,सुरेश वैरागडे ,श्रीपत भुरे, माजी शिक्षणाधिकारी के झेड शेंडे, मनीषा भांडारकर, मंगला वाडीभस्मे, समाजसेवक संजीव भांबोरे, इंजिनीयर त्र्यंबक घरडे, श्रीकृष्ण पडोळे, नीलकंठ कायते उमेश सिंगनजुडे , राजेश आजबले, ,श्रीराम बोरकर व मोठ्या संख्येने ओबीसी समाज यावेळी उपस्थित होता.
0 Response to "ओबीसी समाजाची जातनिहाय गणना करा."
एक टिप्पणी भेजें