-->
घरकुल वर्ककोड डबल! तुकडू कांबळेला न्याय कधी मिळणार?.

घरकुल वर्ककोड डबल! तुकडू कांबळेला न्याय कधी मिळणार?.



.           निवेदन स्वीकारतानां खा.प्रशांत पडोळे 

• १ वर्षापासून संबंधित विभागाकडे पाठपुरावा परंतु न्यायापासून वंचित 
खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांना निवेदन निवेदनाची दखल घेणार काय?.


      संजीव भांबोरे 
"साप्ता. जनता की आवाज" 

भंडारा :- तालुक्यातील पहेला येथील रहिवासी नामे तुकडू किसन कांबळे यांच्या नावाने घरकुल मंजूर झाला असून घरकुलचा वर्ककोड डबल आल्यामुळे घरकुलाचे पाण्याचे पैसे मागील एक वर्षापासून 28000 रुपये मिळालेले नाही. एक वर्षापासून तुकडु कांबळे पंचायत समितीच्या पायऱ्या झिजवत आहे .परंतु आजपर्यंत त्यांना न्याय मिळालेला नाही. आज दिनांक 5 मार्च 2026 ला भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार डॉ.प्रदीप पडोळे यांना ओबीसी समाजाच्या धरणे आंदोलनात निवेदन दिले .यावेळी त्यांच्यासोबत समाजसेवक संजीव भांबोरे व ओबीसी समाजाचे नेते उपस्थित होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की ,तुकडू किसन कांबळे यांच्या नावाने पहेला येथे घरकुल मंजूर झाले असून स्लॅपपर्यंत बांधकाम झालेला आहे. त्यांच्या जॉब कार्ड नंबर MH 28-026-050-001/984 आहे. परंतु त्यांच्या जॉब कार्ड चुकीने 28-026-050-001/155 लिहिण्यात आलेला आहे. त्यामुळे तुकडु कांबळे यांचे घरकुल पाण्याचे मजुरीचे रुपये खात्यात जमा झालेले नाही. त्यामुळे मजुरांचे पैसे कसे द्यायचे प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाले आहे .की आत्महत्या करावी! असा प्रश्न त्यांच्या मनात वारंवार निर्माण होत आहे. त्यांना तात्काळ न्याय देऊन घरकुल पाण्याच्या मजुरीचे 28 हजार रुपये जमा करण्यात यावे.

0 Response to "घरकुल वर्ककोड डबल! तुकडू कांबळेला न्याय कधी मिळणार?."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article