-->
स्थानिक निवासी बेरोजगाराच्या रोजगाराचे पहिले उदघाटन.

स्थानिक निवासी बेरोजगाराच्या रोजगाराचे पहिले उदघाटन.


• नगराध्यक्ष देवश्री कापगते यांचे हस्ते संपन्न • केले वृक्षारोपण • मुळ निवासींचा पहिला विजय 

 
संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटनेच्या सदस्य बेरोजगार युवकांच्या रोजगार दुकानाचे पहिला उदघाटन सोहळा ( रविवार २९ मार्च ) ला तलाव बायपास रोडवर नगराध्यक्ष देवश्री कापगते यांचे हस्ते संपन्न झाले. यावेळी त्या गोरगरीब बावणे कुटुंबियांच्या चेह-यावर आनंदाश्रू तरळले होते. तर हा स्थानिक मुळ निवासींचा पहिला विजय आहे असे प्रतिपादन संघटनेचे सहसचिव किशोर बावणे व मार्गदर्शक रवि भोंगाणे यांनी केले. 
           मुख्य शहर गणेश वार्ड निवासी गोरगरीब बावणे कुटुंबातील विजय बावणे व संजय बावणे यांनी आपल्या घराच्या समोरच आपल्या मुळ "लोहार" व्यवसायासाठी जागा स्वच्छ करून पैशाची जुळवाजुळव करून दुकान थाटले. कारण शहरात बाहेरील लोकांनी येथे अतोनात अतिक्रमणे करून तलाव रोडवर व काही प्रभागात ४०% टक्के शासकीय जागेची स्टँम्प पेपरवर नोटरी करून ती बेकायदेशीर विक्री करीत पळून गेले आहेत. मग स्थानिक मुळ निवासींना का.? पहिला हक्क नाही. यांनी रोजगार करायला जागा धरून दुकान थाटले ते काही विकण्यासाठी नाही. म्हणून सहसचिव किशोर बावणे, पत्रकार रवि भोंगाणे यांनी या स्थानिक बेरोजगाराला मागील नोटीस प्रकरणी प्रसारमाध्यमातून चांगलेच सडेतोड उत्तर दिले होते. अखेर यात गरीब बावणे कुटूंबियांचा विजय झाला आहे. या बावणे परीवाराच्या "भगवान विश्वकर्मा फर्निचर वर्क" प्रतिष्ठानच्या उदघाटन प्रसंगी नगराध्यक्ष देवश्री मनिष कापगते, उद्योजक निलेश सिंगोर, बावणे परीवाराच्या मातोश्री सखुबाई बावणे, शालू विजय बावणे, वैशाली संजय बावणे, बहिण प्रमिला कोसरे, साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटनेचे सल्लागार पत्रकार रवि भोंगाणे, प्रसिद्धी प्रमुख आशिष चेडगे, सहसचिव किशोर बावणे, सदस्य कार्तिक लांजेवार, तुकाराम बोरकर आदी उपस्थित होते. 
          साकोली सेंदूरवाफा स्थानिक निवासी संघटनेच्या मुळ निवासींचा पहिल्या रोजगार दूकानाचे उदघाटन संपन्न झाले हा शहरातील स्थानिक निवासींचा पहिला विजय आहे यासाठी संघटनेचे अध्यक्ष प्रमोद मेश्राम, उपाध्यक्ष नगरसेवक इंजि. सपन कापगते व अनिल कापगते, सचिव प्रदीप मासुरकर, मार्गदर्शक प्रा. हरिश्चंद्र सोनवाने, अनिल मुरकुटे, महेश पोगळे, चंद्रकांत वडीचार, सल्लागार पत्रकार डी. जी. रंगारी, कोषाध्यक्ष गणेश बोरकर, निमंत्रक सदस्यगण ॲड मनिष कापगते, मनिषा काशिवार, चंदू कापगते, सचिन सुर्यवंशी, मयूर गजापूरे, दिगंबर सुर्यवंशी, विशाल साखरवाडे, मोहन फुलबांधे, आशिष भिवगडे, दामोधर सुर्यवंशी, मुकेश पंचभाई, अजय गजभिये, अमोल हत्तीमारे, लिलाधर मुरकुटे, आदित्य चेडगे, रितीक तिडके व सर्व सदस्यांनी या निर्णयाबद्दल गोरगरीब बावणे कुटूंबियांना पुढील यशस्वी रोजगारासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

0 Response to "स्थानिक निवासी बेरोजगाराच्या रोजगाराचे पहिले उदघाटन. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article