-->
राज्यात उलथापालथ! IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली.

राज्यात उलथापालथ! IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली.




21 वर्षात 24 वं Transfer; आता कोणती जबाबदारी सांभाळणार?..

"साप्ताहिक जनता की आवाज" 
वृत्तपत्र प्रतिनिधी 

मुंबई :- प्रशासकीय सेवेतील अत्यंत डॅशिंग, शिस्तप्रिय आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. गेल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल 24 वेळा बदली होण्याचा एक आगळावेगळा पण प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा विक्रम मुंढे यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात 'सिंघम' अशी ओळख असलेले 2005 बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आली आहे. आता त्यांची नियुक्ती मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग या महत्त्वाच्या विभागांच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. नियमानुसार एखाद्या पदावर तीन वर्षे काम करणे अपेक्षित असताना,मुंढे यांची सरासरी वर्षभरातच बदली होण्याचे सत्र यंदाही कायम राहिले आहे.
राज्याच्या प्रशासकीय वर्तुळात 'सिंघम' अशी ओळख असलेले 2005 बॅचचे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदावरून बदली करण्यात आली आहे. आता त्यांची नियुक्ती मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन तसेच महसूल व वन विभाग या महत्त्वाच्या विभागांच्या प्रधान सचिवपदी करण्यात आली आहे. नियमानुसार एखाद्या पदावर तीन वर्षे काम करणे अपेक्षित असताना,मुंढे यांची सरासरी वर्षभरातच बदली होण्याचे सत्र यंदाही कायम राहिले आहे.

0 Response to "राज्यात उलथापालथ! IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article