-->
संशयित हालचालीत तिघे ताब्यात; धारदार चाकू व कार जप्त.

संशयित हालचालीत तिघे ताब्यात; धारदार चाकू व कार जप्त.


   नरेंद्र मेश्राम 
सप्ता."जनता की आवाज"

पालांदूर :- पालेपेंढरी गावातील चौक परिसरात संशयास्पद हालचाली करत फिरणाऱ्या तिघांना पालांदूर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून धारदार चाकू व चारचाकी वाहन जप्त केले. ही कारवाई सोमवारी (दि. ९) पहाटे सुमारे ३.२५ ते ४ वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक गिरीधर पेंदोर व पथक सरकारी वाहनाने पालेपेंढरी परिसरात गस्त घालत असताना एक चारचाकी वाहन संशयास्पदरीत्या फिरताना दिसले. वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये उमेश दादाराव कारमोरे (वय २६), राजेंद्र अनिल खेडीकर (वय २७) व समीर संजु धोके (वय २६) हे तिघे संशयित हालचाली करताना आढळले.
दोन पंचांसमक्ष झडती घेतली असता आरोपींकडून सुमारे ४३ सेमी लांबीचा धारदार लोखंडी चाकू आढळून आला. तसेच महिंद्रा कंपनीची एसयूव्ही 500 (क्र. MH-12 HT 7171) ही कारही जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत ४ लाख २०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलीस शिपाई घनश्याम दिवाकर वनवे यांच्या फिर्यादीवरून पालांदूर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीधर पेंदोर करीत आहेत.

0 Response to "संशयित हालचालीत तिघे ताब्यात; धारदार चाकू व कार जप्त."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article