वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ जागतिक धम्मपरिदेला बाबासाहेब जाधव कडून दहा हजाराचे धम्म दान !.
बुधवार, 4 मार्च 2026
Comment
जितेंद्र गाडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
बुलढाणा :- मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील त्यागमुर्ती नागोराव जाधव गुरूजी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागभूमी नागपूर येथे १४ आक्टोंबर १९५६ रोजी हिन्दु धर्माचा त्याग करून महाकरूणीक भगवान गौतम बुध्दाचा विज्ञानवादी बौद्ध धर्म स्वीकारून धर्मांतर केले त्याच्या सोबत भारतातील महार व खालच्या जातीतील ९ कोटी जनतेने बौध्द धर्माची शपथ घेऊन हिन्दु धर्माचा त्याग करून बौध्द धर्म स्वीकारला हे जगातील सर्वात मोठे धर्मांतर होते.
त्या धर्मातरच्या दुसऱ्या दिवसी सिंदखेड राजा येथील त्यागमुर्ती नागोराव जाधव गुरुजी यांनी डॉ. बाबासाहेब आबेडकर यांचे १५ आक्टोंबर १९५६ रोजी दर्शन घेऊन म्हणाले की, बाबा मला तुमच्या सोबत काम करावयाचे आहे. तर बाबासाहेब म्हणाले की, तू काय करतोस तर ते म्हणाले मी शिक्षक आहे. बाबासाहेब म्हणाले तूला नोकरी सोडावी लागेल व त्याच दिवशी नोकरीचा राजीनामा दिला व विनाचपल निःस्वार्थ जे वाहन भेटेल पायी वाड्या वसत्यात जाऊन मीळेल तेथे जेवन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व आपल्यावर लादलेला हिन्दु धर्माचा पगडा हिन्दु धर्मामधील अंधश्रद्धेचा विचार सोडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व विज्ञानवादी बोध्द धर्माचा स्वीकार करा तरच आपल्या समाजाची प्रगती आहे असा विचार अहोरात्र निळी डोपी डोक्यावर घालून
मरेपर्यंत प्रचार प्रसार करणारे त्यागमुर्ती नागोराव जाधव गुरूजी यांच्या स्मरणार्थ छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) भिमटेकडी जटवाडा येथील विश्वशांती बुध्द विहार समितीच्या आयोजीका आर्याजी प्राध्यापीका धम्मदर्शना माहाथेरो यांनी तीस वर्षे संघर्ष करून भिमटेकडी वसाड जागेवर बौध्द धम्मची बाग फुलवीली त्या बागेत बुध्दाचा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार पेरण्याचे काम त्या करीत आहेत. अशा या वसाड वस्तीत धम्मची बगफुलवून त्या बागेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हायातीत रंगून (जपान) येथे पहीली जागतीक धम्मपरिषद झाली होती. आता २६ फेब्रुवारी ते २ मार्च असा पाच दिवस धम्म परिषद छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील भिमटेकडी जडवाडा येथे धम्मपरिषद होत आहे. दुसरी
या भव्यदिव्या धम्मपरिषदेत ३० देशातील बौध्द भिक्खू-भिक्खुणी संघ धम्मदेशना देत आहे. दररोज हाजारो बौध्द अनुयायी उपासक उपासिका हजेरी लावून धम्मदेशना घेत आहे. अशा बुध्द धम्माचा प्रसार प्राचार व्हा म्हणून आर्याजी प्राध्यापीका धम्मदर्शना महाथेरो यांनी आयोजित केलेल्या जागतीक धम्म परिषदेला त्यागमुर्ती नागोराव जाधव गुरूजी यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले बुलडाण्याचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव व त्यांच्या सुनबाई मा. शिक्षण विस्तार अधिकारी विमलताई जाधव हे ८० टक्के समाजकारण, धर्मकारण व २० टक्के राजकारण करणारे यांनी या जागतीक धम्म परिषदेला वडीलांच्या स्मरणार्थ १० हजाराचे धम्म दान परिषदेच्या धम्मपिठावर प्राध्यापक
आर्याजी धम्मदर्शना महाथेरो व भंते संघपाल यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले व वडीलांच्या स्मरणार्थ १० हजार रूपयाचे धम्म दान केले यावेळी दैनिक सामपत्रचे संपादक गणेश दादा सुरडकर, भिक्खु-भिक्खूणी संघ उपासक-उपासिका यांच्या उपस्थितीत दिले. या धम्मदान देण्यामागे माझा प्रचार व्हा म्हणून मी करीत आहे हा समज उपासक उपासिकांनी करून घेऊ नये कारण बुध्द धर्मात दान परिमीतेला अन्यासाधारण महत्व आहे म्हणून धम्माचा प्रचार व प्रसार व्हा म्हणून धम्मदान हे अत्यावश्यक आहे म्हणून धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रत्येकानी धम्मदान करावे हा उद्देश समोर ठेवून केला आहे.
0 Response to "वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ जागतिक धम्मपरिदेला बाबासाहेब जाधव कडून दहा हजाराचे धम्म दान !."
एक टिप्पणी भेजें