-->
जिद्द, मेहनत आणि मार्गदर्शनाची कमाल – NMMS परीक्षेत शारदा विद्यालयाचे २२ विद्यार्थी उज्ज्वल यशस्वी.

जिद्द, मेहनत आणि मार्गदर्शनाची कमाल – NMMS परीक्षेत शारदा विद्यालयाचे २२ विद्यार्थी उज्ज्वल यशस्वी.


दिगंबर देशभ्रतार 
"साप्ता." जनता की आवाज" 

भंडारा/तुमसर :- प्रतिकूल परिस्थितीवर मात करत, स्वप्नांना पंख देण्याची जिद्द मनात बाळगत शारदा विद्यालय, तुमसरच्या २२ विद्यार्थ्यांनी National Means-cum-Merit Scholarship Scheme (NMMS) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण शहरात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

NMMS ही केवळ परीक्षा नसून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा करणारी सुवर्णसंधी आहे. अत्यंत स्पर्धात्मक अशा या परीक्षेत २२ विद्यार्थ्यांचे यश हे त्यांच्या चिकाटीचे, कठोर परिश्रमाचे आणि शिस्तबद्ध तयारीचे फलित आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये माही गाढवे, मैथिली बडोले, गौरव हटवार, श्रेया ठाकरे, दिशांक ढोके, रीतिका डोंगरवार, निवृत्ती चौधरी, कृतिका बुधबावरे, उत्कर्ष कारेमोरे, सागर अतकारी, सक्षम फुले, वीर सेलोकर, सौम्या बिसन, आर्या बुरडे, नताशा बांभोरे, असहर कुरेशी, इशिका बाणते, अथर्व कांबळे, गुंजन कामथे, पूर्वी नगरधने व आयुष रहांगडले यांचा समावेश आहे.

विद्यालयाचे प्राचार्य राहुल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना सांगितले, “यशस्वी विद्यार्थी केवळ गुणांनी मोठे होत नाहीत, तर संघर्षातून उभे राहून स्वप्न पूर्ण करण्याची हिंमत दाखवतात. या २२ विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे की, परिस्थिती कशीही असली तरी जिद्द आणि योग्य मार्गदर्शन असेल तर यश निश्चित आहे.”

विद्यार्थ्यांसाठी विशेष सराव चाचण्या, अभ्यास नियोजन, वैयक्तिक मार्गदर्शन व नियमित प्रेरणादायी सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षकांनी केवळ विषय शिकवला नाही, तर आत्मविश्वास वाढवण्याचे कामही केले. पालकांनीही मुलांवर विश्वास ठेवत त्यांना आवश्यक ते सहकार्य दिले.

शारदा विद्यालयाने या यशातून पुन्हा एकदा गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा अधोरेखित केली आहे. या यशामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही स्पर्धा परीक्षांविषयी उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण झाला असून, हे २२ विद्यार्थी अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श ठरले आहेत.या यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य राहूल डोंगरे,शिक्षकवृंद ज्योती बालपांडे,दिपक गडपायले,श्रीराम शेंडे,संजय बावनकर,अशोक खंगार,अंकलेश तिजारे,विद्या मस्के,नितुवर्षा मुकुरने, प्रीती भोयर, सारिका आठोडे ,सूकांक्षा भुरे,श्रेया उरकुडे,नेहा बारई ,दिपक बालपांडे,नारायण मोहनकर आदींनी अभिनंदनाचा वर्षाव केला.

0 Response to "जिद्द, मेहनत आणि मार्गदर्शनाची कमाल – NMMS परीक्षेत शारदा विद्यालयाचे २२ विद्यार्थी उज्ज्वल यशस्वी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article