-->
शिक्षणमंत्री यांना वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

शिक्षणमंत्री यांना वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

.         निवेदन देतांना बहुजन वचींतचे पदाधिकारी 

संजीव भांबोरे 
साप्ता."जनता की आवाज"

भंडारा :- साकोली येथील वंचित बहुजन आघाडी च्या वतीने शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदना मधून मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन पाठवण्यात आलेले आहे राईट ऑफ चिल्ड्रन टू थ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन 2009 हा कायदा देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल व गरजू घटकातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे यात अत्यंत उदात्त हेतूने अस्तित्वात आला आहे या कायद्यामागील मूलभूत उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक मुलाला गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची समान संधी उपलब्ध करून देणे होय मात्र अलीकडे आरटीई अंतर्गत शाळेच्या अंतराच्या निकषात करण्यात आलेला बदल अत्यंत चिंताजनक आहे पूर्वी अंतर निकष 3 किलोमीटर पर्यंत होता परंतु तो आता 1 किलोमीटर करण्यात आल्याने अनेक गरजू व पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेतून वंचित राहण्याची वेळ आली आहे ग्रामीण व उपनगर भागात दर्जेदार शाळा एक किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर असतात त्यामुळे हा बदल प्रत्यक्षात आर टी इ च्या मूळ उद्देशालाच बाधा आणणारा ठरत आहे या निर्णयामुळे मुलांच्या शैक्षणिक भविष्यात गंभीर धोका बसत असून पालकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे आरटीई कायदा हा मुलांच्या हक्काच्या संरक्षण करणारा कायदा आहे परंतु सध्याच्या अंतर निकष बदल हा त्या हक्काची पायमल्ली करणारा ठरत आहे शासनाने हा निर्णय घेताना ग्रामीण वास्तव वाहतूक सुविधा सामाजिक परिस्थिती आणि दर्जेदार शिक्षणाची उपलब्धता यांच्या पुरेसा विचार केलेला दिसत नाही त्यामुळे खालील मागण्या वंचित बहुजन आघाडीने केलेले आहेत शाळेचे अंतरातील निकस 1 किलोमीटर ची तात्काळ रद्द करण्यात यावी, पूर्वीप्रमाणे 3 किलोमीटर अंतर निकस पुन्हा लागू करण्यात यावा ,तसेच पालक व स्थानिक प्रतिनिधींची बैठक घेऊन या निकषावर पुनर्विचार करण्यात यावा अशा पद्धतीचे निवेदन तहसीलदारामार्फत शिक्षण मंत्री यांना दिलेली आहे निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महिला अध्यक्ष तनुजा नागदेवे ,जिल्हा महासचिव डी जी रंगारी ,तालुका अध्यक्ष जगदीश रंगारी, तालुका महासचिव अमित नागदेवे,, केवळराम ऊके, भाग्यशाली मेश्राम ,बबीता राऊत, गीता वलथरे, जोशना खोबरागडे, माला राऊत ,व प्रमिला कटाने, सविता डोंगरे, गणेश गजभिये, कविता कसारे इतरही भरपूर याप्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Response to "शिक्षणमंत्री यांना वंचित बहुजन आघाडीचे निवेदन "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article