-->
मोबाईलच्या गैरवापरातून वाढत असलेले सायबर गुन्हे; विद्यार्थ्यांनी सावध राहावे – PSI प्राची सपकाळ.

मोबाईलच्या गैरवापरातून वाढत असलेले सायबर गुन्हे; विद्यार्थ्यांनी सावध राहावे – PSI प्राची सपकाळ.

• शारदा विद्यालय तुमसर येथे प्रतिपादन

दिगंबर देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
तुमसर :- स्थानिक शारदा विद्यालय, तुमसर येथे विद्यार्थ्यांमध्ये सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी “सायबर क्राइम” या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून तुमसर पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक प्राची सपकाळ उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य राहूल डोंगरे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी टेकचंद पुष्पतोडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल नितीन झंझाड उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ग्रंथभेटी देऊन स्वागत व सत्कार करण्यात आले.

यावेळी बोलताना PSI प्राची सपकाळ यांनी मोबाईलच्या चुकीच्या वापरामुळे सायबर गुन्हे कसे घडतात यावर सविस्तर प्रकाश टाकला. आजकाल सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी मैत्री करणे, वैयक्तिक माहिती किंवा फोटो शेअर करणे, बनावट लिंकवर क्लिक करणे, OTP किंवा बँक खात्याची माहिती देणे यामुळे फसवणुकीचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत, असे त्यांनी सांगितले. काही वेळा मोबाईलवरील गेम्स, सोशल मीडिया किंवा अॅप्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ब्लॅकमेलिंग, फेक आयडी तयार करणे, फोटो एडिट करून बदनामी करणे अशा गुन्ह्यांना सामोरे जावे लागते, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर अत्यंत जबाबदारीने करावा, अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये आणि संशयास्पद बाबी त्वरित पालक किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य राहुल डोंगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भविष्यात MPSC, UPSC किंवा इतर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवायचे असेल तर आतापासूनच मोबाईलचा अनावश्यक वापर टाळून वाचन संस्कृती जोपासणे अत्यंत आवश्यक आहे. सातत्यपूर्ण अभ्यास आणि चांगल्या सवयी अंगीकारल्यास विद्यार्थी निश्चितच यशाचे शिखर गाठू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका नितुवर्षा मुकुर्णे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका ज्योती बालपांडे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक गडपायले, श्रीराम शेंडे, संजय बावनकर, अशोक खंगार, अंकलेश तिजारे, नारायण मोहनकर, दीपक बालपांडे, प्रीती भोयर, सारिका आठोडे, सुकांक्षा भुरे, श्रेया उरकुडे, बेनिता रंगारी, नेहा बारई, झनकेश्वरी सोनवणे, विद्या देशमुख, बंदिनी, दातेबाई, मानकर बाई आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. 

सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थ्यांना सजग करणारा हा कार्यक्रम अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरला.

0 Response to "मोबाईलच्या गैरवापरातून वाढत असलेले सायबर गुन्हे; विद्यार्थ्यांनी सावध राहावे – PSI प्राची सपकाळ."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article