पहेला येथे सम्यक बौद्ध विहार तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 12, 13, १४ एप्रिल ला विविध कार्यक्रमाचे आयोजन.
सोमवार, 6 अप्रैल 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील पहेला येथे भारतरत्न, बोधिसत्व ,विश्वरत्न ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने १२ एप्रिल ला रात्री 9.30 वाजता सुप्रसिद्ध गायिका अश्विनी रोशन चंद्रपूर यांचा भीमगीत समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १३ एप्रिल ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ५० गुणांचे बहुपर्यायी सामान्य ज्ञान परीक्षा दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. तर १४ एप्रिल ला सायंकाळी ४ वाजता धम्म रॅली व रात्री ८ वाजता स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आलेले आहे करिता वरील कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन सम्यक बौद्ध विहार , नवयुवा भीम विचार मंच पहेला यांनी केलेले आहे.
0 Response to "पहेला येथे सम्यक बौद्ध विहार तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 12, 13, १४ एप्रिल ला विविध कार्यक्रमाचे आयोजन."
एक टिप्पणी भेजें