नांदेडमध्ये गँगवॉरचा भडका की प्रशासकीय अकार्यक्षमतेचा बळी?.
सोमवार, 6 अप्रैल 2026
Comment
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- शिखाची दक्षिण काशी आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या नांदेड शहरात शुक्रवारी यरात्री रक्ताचा सडा पडला. दोन टोळ्यांमधील वर्चस्ववादातून झालेल्या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्हा दहशतीखाली आहे. रई स्क्वेअरश आणि थेट सरकारी रुग्णालयातील अपघात विभागात घुसून झालेली ही हत्याकांडे केवळ गुन्हेगारांची हिंमतच नाही, तर पोलीस प्रशासनाचे अपयश आणि फोफावलेल्या गुन्हेगारीचे जळजळीत वास्तव समोर आणणारी आहेत. नांदेड शहरात सध्या अवैध ६ दि. अमली पदार्थांची तस्करी आणि गुटख्याची सर्रास विक्री उघडपणे सुरू आहे. अल्पवयीन मुले शिक्षणाची वाट
सोडून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत आहेत. महाराष्ट्रात गुटखा बंदी असूनही प्रत्येक नाक्यावर तो उपलब्ध आहे. मध् मग पोलीस यंत्रणा नेमकी करते काय? कंवळ हप्तेखोरी आणि अर्थपूर्ण संबंध ांमुळेच या गुंडांना रान मोकळे मिळाले आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत. पोलीस निरीक्षक की मर्जीतीलप्पादी? जिल्ह्यात कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक असूनही त्यांना वरिष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या मर्जीप्रमाणे कारभार करावा लागत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. ज्या वादग्रस्त पोलीस निरीक्षकांवर जातीयवादाचे किंवा भ्रष्टाचाराचे आरोप झाले, जे निलंबित झाले, त्यांना पुन्हा पोलीस मुख्यालयात किंवा महत्त्वाच्या ठाण्यांमध्ये स्थान दिले जात आहे.
तिहेरी हत्याकांडानंतर जिल्हा हादरला !
वादग्रस्त अधिकाऱ्यांकडे पोलीस ठाण्याची धुरा सोपवणे म्हणजे गुन्हेगारांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रोत्साहन देण्यासारखेच आहे. आयजींश्चे विशेष पथक फक्त घाडींचे नाटक करण्यात मग्न असल्याची चर्चा आता जनमानसात उघडपणे सुरू आहे.लोक प्रतिनिधींची दुटप्पी भूमिका आणि मेजवान्या दिवसभर एकमेकांवर चिखलफेक करणारे राजकीय नेते रात्री मात्र एकत्र बसून मेजवान्या झोडतात, तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता या दहशतीच्या छायेत जगते. गुन्हेगारांना राजकीय आश्रय देणाऱ्या या श्मोठ्या नेत्यांमुळेच नांदेडची कायदा - सुव्यवस्था चव्हाट्यावर आली आहे. 2023 चे बोंडार हत्याकांड असो वा कालचे गैंगवॉर, यामागील मूळ कारण
म्हणजे पोलीस आणि राजकीय नेत्यांचे साटेलोटे हेच आहे आता तरी जागे व्हा प्रशासनावर दबाव टाकण्याची वेळ ! हा तिहेरी भरसंहार केवळ गुन्हेगारांनी केला नसून, तो व्यवस्वेच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे. जोपर्यंत श्मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती थांबत नाही आणि लोकप्रतिनिधींची मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत नांदेड सुरक्षित होणार नाही. आता केवळ प्रशासनावर विसंबून न राहता, शहरातील सुज्ञ नागरिकांनी, सर्व मिर्गीय बांधवांनी एकत्र येऊन व्यवस्थेवर दबाव निर्माण करण्याची गरज आहे. प्रश्न फक्त हत्याकांडाचा नाही, तर तुमच्या-आमच्या सुरक्षिततेचा आहे. या रक्ताच्या सख्धाला जबाबदार कोण?..
0 Response to "नांदेडमध्ये गँगवॉरचा भडका की प्रशासकीय अकार्यक्षमतेचा बळी?."
एक टिप्पणी भेजें