-->
माणसाचे भविष्य ग्रहांनी नाही तर त्याचे विचार, कृती आणि प्रयत्नांनी घडते -- महंत.श्री. गोपालव्यास कपाटे महानुभाव.

माणसाचे भविष्य ग्रहांनी नाही तर त्याचे विचार, कृती आणि प्रयत्नांनी घडते -- महंत.श्री. गोपालव्यास कपाटे महानुभाव.


"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

भंडारा :- ज्योतिष सांगणारे मंत्र तंत्र करणारे जादूटोणा उतरवणारे ग्रहशांती करणारे, भविष्य बदलून देण्याचे आश्वासन देणारे असंख्य बुवा-बाबा समाजात फिरतांना दिसतात, अशोक खरात हा त्या संपुर्ण व्यवस्थेचे उघड झालेले रुप आहे, कोणत्याही ज्योतिषाला माणसाचे भविष्य सांगता येत नाही, आणि ते बदलता देखील येत नाही, ग्रह ताऱ्यांच्या हालचालीशी माणसाच्या आयुष्यातील घटना जोडण्याचा जो दावा केला जातो.

 तो विज्ञानाने कधीच मान्य केलेला नाही त्यामुळे हात पाहाने, कुंडली जुळवने, अंकशास्त्र, राशीफळ, ग्रहशांती, रत्न खडे, वास्तुदोष या सारख्या गोष्टी या प्रत्यक्षात भविष्य सांगण्याच्या नावाखाली चालणाऱ्या फसवणुकीचे प्रकार आहे, खरे तर भोंदूबाबा, बुवा ओळखणे फार कठीण नाही, जो माणुस चमत्काराचा दावा करतो.


 जो कर्मकांडाच्या माध्यमातून तुमचे भविष्य बदलून देण्याचे आश्वासन देतो, जो लोकांकडून पैसा, संपत्ती गोळा करतो, तो आध्यात्मिक गुरु नसून भोंदूच असतो, खरे आध्यात्म भिती निर्माण करीत नाही, ते माणसाला आत्मविश्वास देते आणि विवेकाचा मार्ग दाखवते, महाराष्ट्राच्या संतपरंपरेने याच विवेकाचा संदेश दीला आहे, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत गाडगेबाबा इत्यादी अनेक संतांनी समाजाला चमत्काराची स्वप्ने दाखवली नाही, त्यांनी समाजाला स्वतःच्या श्रमावर आणि विवेकावर विश्वास ठेवायला शिकवले.

अंधश्रद्धा, चुकीच्या रुढी, परंपरा, कर्मकांडातून समाजाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, समाजाला जागवण्याचा प्रयत्न केला, म्हणूनच आज संत परंपरेचा स्वरा अर्थ समजून घेण्याची गरज आहे, नासिकच्या खरात प्रकरणाने आपल्याला एक मोठा धडा दीला आहे, भोंदू बुवांचा प्रश्न केवळ एखाद्या व्यक्तीचा नाही, तो समाजाच्या मानसिकतेचा प्रश्न आहे, ज्या समाजात भिती आणि अज्ञान वाढते त्या समाजात भोंदूची बाजारपेठही वाढते, आणि ज्या समाजात विवेक, आत्मविश्वास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढतो त्या समाजात अशा बाबा बुवांची भोंदूची दुकाने आपोआप बंद पडतात, मुलांची लग्न जुळवताना कुंडली सोबत घेवून फीरनारे पालक उठता बसता धागा, दोरा, ताईत, गंडा मांत्रिकगिरी करणारे कुटुंबातील सदस्य म्हणजे भोंदूबाबासाठी एक पर्वणीच असते, "अरे ज्योतिष्या, माझ्या दारी नको येवू; माझे दैव मले कळे, माझा हात नको पाहू " या बहिणाबाईंच्या ओळींमधून आत्मविश्वास आणि विवेकाची ताकद दडलेली होती, आपल्या कुटुंबातील मुला-मुलींना आणि तरुणांना हे समजावून सांगणे आवश्यक आहे, की माणसाचे भविष्य ग्रहांनी नाही तर त्याच्या विचाराने, कृतीने आणि प्रयलांनी घडते! जय श्रीकृष्ण.

.                मंहत श्री गोपालव्यास कपाटे. 
                   उरळीकांचन, पुणे महाराष्ट्र 

0 Response to "माणसाचे भविष्य ग्रहांनी नाही तर त्याचे विचार, कृती आणि प्रयत्नांनी घडते -- महंत.श्री. गोपालव्यास कपाटे महानुभाव."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article