• रोखठोक ऑपरेशन •
शुक्रवार, 3 अप्रैल 2026
Comment
• खाजगी शाळा की लुटमार कमिशनखोरींची दूकान..?
• दिल्लीत शिक्षणमंत्री आशिष सुद यांचे खाजगी शाळांवर कारवाईचे आदेश • ९० रूपयांची पुस्तक ९०० रूपयाला • मनमानी फी वाढ करणा-या शाळांवर आता कारवाईचा बडगा.
आशिष चेडगे
"सापताहीक जनता की आवाज"
भंडारा/साकोली :- काही खाजगी शाळांनी मुलांचे शिक्षण सोडून पुस्तक माफीया बनण्यासाठी पालकांकडून अतोनात पैसा लुटमार करण्याचा गोरखधंदा चालविला आहे. यावर मनमानी शुल्कवाढीप्रकरणी खासगी शाळांवर कारवाईचे आदेश दिल्ली शिक्षणमंत्री आशिष सुद यांनी दिले. मनमानीपणे शुल्कवाढ करणाऱ्या खासगी शाळांवर दिल्ली सरकार कठोर कारवाई करेल, असे शिक्षणमंत्री आशिष सूद यांनी सोमवार ३० मार्चला सांगितले. तसेच अशा शाळांची यादी तयार करण्यात आली असून, प्रत्येक शाळेची तपासणी केली जाईल. तपासणीच्या निष्कर्षांनुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
खाजगी शाळा व पुस्तक माफीया यांच्या संगनमताने गोरगरीब पालकांना त्यांच्या शाळेतूनच पुस्तके, गणवेश, बुट व इतर साहित्य घेण्यासाठी निर्बंध घालून जबरदस्ती करण्यात येत आहे. पुस्तकांची बिले १२ हजारांवर, गणवेश १० हजार अशी अतोनात लुट काही खाजगी शाळा व कॉन्व्हेंटतर्फे सुरू आहे. हा पर्दाफाश केला आहे काल दिल्लीत "झी मीडिया न्यूज" ने यावर दिल्ली सरकार तात्काळ एक्शन मोड मध्ये आली आणि खाजगी शाळेंची संपूर्ण चौकशी लावली असून सर्व १६७७ खाजगी शाळांचे ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. याची उपविभागीय दंडाधिकारी यांनी चमू गठीत करून खाजगी शाळांचा डेटा १० दिवसांत सार्वजनिक करण्यात येईल अशी माहिती प्राप्त झाली आहे. यात पालकांना खाजगी शाळांनी जी पुस्तके व प्रवेश फी अतोनात बिले पाठविली ती बिले काही जागृत पालक जनतेने झी मीडिया ऑपरेशनच्या 9310497453 या व्हाट्सअप वर पाठविली आणि हे एपिसोड सुरू होताच दिल्लीसह उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेश सरकारने सुद्धा खाजगी शाळांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.
तिकडे दिल्लीत "झी मीडिया" चे ऑपरेशन तर इकडे भंडारा जिल्ह्यात "साकोली मिडिया" ची एक्शन •
खाजगी शाळांतर्फे गोरगरीब पालकांना अव्याढव्य किंमतीत पुस्तके विकणे, गणवेश बुट व इतर साहित्य घेण्यासाठी जबरदस्तीने निर्बंध लादणे हा प्रकार भंडारा जिल्ह्यातही काही नविन नाही. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अतोनात दरवाढ व अव्याढव्य पुस्तके किंमतीची सक्ती करु नये हा शासकीय आदेश असतांनाही मात्र जिल्ह्यात सर्रासपणे हा शिक्षणाचा गोरखधंदा व गरीब आई वडीलांना लुटमार प्रकार सुरूच आहे. यावर जर कोणत्याही खाजगी शाळा अथवा कॉन्व्हेंटच्या प्रशासनाने पालक जनतेवर अतोनात शुल्क किंवा अव्याढव्य रक्कमेची पुस्तके घेण्यासाठी जोर जबरदस्ती केली तर थेट शिक्षणाधिकारी भंडारा व तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी यांकडे जाऊन तक्रार दाखल करावी. असे अव्याढव्य रक्कमेच्या मागणींची बिल थेट पालक जनतेने "साकोली मिडीया" च्या 7083430314 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवावीत ती बिले जनहितार्थ करून अश्या लुटमार खाजगी शाळांवर कारवाई करण्यासाठी शासनाला तातडीने अवगत केले जाईल. असे आवाहन महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा अध्यक्ष आशिष चेडगे यांनी केले आहे.
जनहितार्थ प्रसारण - महाराष्ट्र शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य, जिल्हा भंडारा - कार्यालय साकोली.
0 Response to "• रोखठोक ऑपरेशन • "
एक टिप्पणी भेजें