-->
जय भिमच्या जयघोषाने अड्याल नगरी दुमदुमली.

जय भिमच्या जयघोषाने अड्याल नगरी दुमदुमली.

जय भिमच्या जयघोषाने अड्याल नगरी दुमदुमली.

• तीन दिवसीय भीम जयंती कार्यक्रम उत्सव जल्लोषात संपन्न

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अड्याल येथील वैशाली बुद्धविहार बाजारपेठ अडयाल,तालुका.पवनी,जिल्हा. भंडारा, म.रा.येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तर्फे गावातील पाच बुद्ध विहार वैशाली, मैत्रेय, रमाई,पंचशिल, सुबोध यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 13,14, आणि 15 एप्रिल ला सकाळी 11.00 वाजता सर्व अतिथींच्या उपस्थितीत बौद्ध विहारात वंदना घेण्यात आली, त्यानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला प्रमुख अतिथी माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र वासुदेवजी हजारे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर सकाळी 11.15 वाजता उपस्थित वक्त्यांचे समाजप्रबोधन पर मार्गदर्शन झाले. कार्यक्रमाचे उद्घाटक सरपंच शिवशंकर मुंगाटे हे होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. अनुभा हर्षल मेश्राम ह्या होत्या , प्रमुख वक्ते सामाजिक कार्यकर्त्या सरयू डहाट मॅडम, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिदासजी नान्हे सर, विशेष अतिथी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णाताई मुंगाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र वासुदेवजी हजारे, पंचायत समिती सदस्य सीमाताई गिरी, ग्रामविकास अधिकारी पौर्णिमाताई साखरे, ग्राम विकासअधिकारी हिरालाल खंडाईत हे होते, वक्त्यांचे समाजप्रबोधन बहुमूल्य मार्गदर्शन झाले त्यानंतर दहावी, बारावीच्या परीक्षेत प्रथम, द्वितीय आलेल्या चारही शाळेच्या विद्यार्थ्यांना मोमेंटो, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, त्यानंतर सायंकाळी 07.00 संगीतमय भीमगीत आरकेस्ट्रा सादर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी दिनांक 14.04.2026 ला सकाळी 08.00ते 11.00 वाजता सर्व बुद्ध विहार मध्ये बाईक रॅली काढून ध्वजारोहण,वंदना घेण्यात आली,सायंकाळी 06.00 ते रात्री 10.00 पर्यंत DJ धम्म रॅली काढण्यात आली उद्घाटक सरपंच शिवशंकर मुंगाटे हे होते, सह उद्घाटक वन परीक्षेत्र अधिकारी योगेशजी शर्मा साहेब, अडयाळ कनिष्ठ महाविद्यालय चे प्राचार्य चरणदासजी बावणे सर, हे होत रॅली करता विशेष सहकार्य ठाणेदार धनंजय पाटील यांचे लाभले, तिसऱ्या दिवशी दिनांक 15.04.2026 ला सायंकाळी सहा ते गावकरी मान्यवरांच्या आगमनापर्यंत वैशाली बुद्धविहार बाजारपेठ अडयाल येथे सामूहिक सहभोजनाचा कार्यक्रम पार पडला,दरम्यान समिती तर्फे घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धा, निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना उपास्थित अतिथी ठाणेदार धनंजय पाटील यांच्या हस्ते मेडल,प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले, सांस्कृतिक विभाग प्रमुख गौतम जनबंधू सर होते, सदर कार्यक्रमाचे संचालन, बुद्ध वंदना वैशाली बुद्धविहार बाजारपेठ अडयाल चे अध्यक्ष तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष मुनीश्वर मोतीरामजी बोदलकर यांनी केले, आभार प्रदर्शन मनोजभाऊ ढवळे यांनी केले,वरील तिन दिवसीय कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समितीचे अध्यक्ष मुनीश्वर बोदलकर,उपाध्यक्ष विकास टेंभुर्ण,सचिव विपिन टेंभुर्ण,सचिव पंकज दिलीपजी वानखेडे, सहसचिव अरुणभाऊ कराडे, कोषाध्यक्ष भाऊराव बोरकर सर, सह कोषाध्यक्ष कल्पना जांभूळकर, साधनाताई कासारे सर्व बौद्ध उपासक उपासिका युवक,समितीचे सदस्य , व्यवस्थापन समिती, सल्लागार समिती, धम्म रॅली समिती, यांनी मोलाचे सहकार्य केले, समस्त ग्रामवासीयांनी सहकार्य केले, ठाणेदार धनंजय पाटील यांनी चोख पोलिस संरक्षण दिले,सदर भीम जयंती जल्लोषात साजरी झाली.

0 Response to "जय भिमच्या जयघोषाने अड्याल नगरी दुमदुमली."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article