"संघर्ष करण्यासाठी आधी संघटित होणे गरजेचे आहे,- रोशन फुले"
शुक्रवार, 17 अप्रैल 2026
Comment
"पाले पेंढरीत समता सैनिक दलाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा"
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- समता सैनिक दलाचा तिसरा वर्धापन दिन पाले पेंढरी येथे उत्साह, शिस्त आणि जोशपूर्ण वातावरणात मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक रोशन तालुकाप्रमुख लाखांदूर यांनी संघर्ष करण्यासाठी आधी संघटित होणे गरजेचे आहे तरच आपल्या संघर्षाला यश प्राप्त होईल असे प्रतिपादन केले आहे.
कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी उपस्थित समता सैनिक दलाच्या सैनिकांना मार्गदर्शन करताना रोशन फुले पुढे म्हणाले समाजावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी आणि आजची देशातील परिस्थिती पाहता आपल्याला समाज हिताचे रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर राहिले पाहिजे. आज संविधान धोक्यात आहे म्हणजे आपले स्वातंत्र्य धोक्यात आहे खरं बोलणाऱ्यांना जेलमध्ये पाठवले जाते आणि खोट्याचं राज्य चालते त्यामुळे संघटनेला मजबूत करण्याची वेळ आलेली आहे. सैनिकांनी कुठल्याही परिस्थितीत तत्पर असले पाहिजे असेही ते म्हणाले.
प्राध्यापक गजेंद्र गजभिये यांनी समता सैनिक दलाची स्थापना व त्यामागचे उद्देश आणि त्याची गरज काय हे सैनिकांना उपस्थित त्यांना पटवून दिले. अध्यक्ष असणार सीडी देवरे सर यांनी फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा जागर समाजात पोहोचवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
महिला व युवक कार्यकर्त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवत संघटनेची ताकद आणि एकजूट दाखवून दिली. उपस्थितांनी संविधानिक मूल्यांचे जतन, सामाजिक अन्यायाविरुद्ध लढा आणि समतेच्या मार्गावर चालण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गौरी उप जी ओ सी, उद्घाटक गजेंद्र गजभिये रा. ऑफिसर, मार्गदर्शक रोशन फुले ता प्रमुख,कृष्णा सूर्यवंशी,दिलीप गजघाटे, हरिदास पिल्लेवान, पाहुणे भगवान शिवनकर शालू गजघाटे,अलकाताई नांन्हे, दिगंबर पिल्लेवान, सौरभ गजघाटे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योजना माटे शाखाप्रमुख, रागिना गजघाटे, नंलू गजघाटे, रमा पिल्लेवान, विद्या माटे, मायावती पिल्लेवान,छाया पिल्लेवान,पौर्णिमा गाजघाटे, पौर्णिमा पिल्लेवान नम्रता गजघाटे, भूमिका गाजघाटे संगीता मेंढे, रेखा पिल्लेवान, प्रीती पिल्लेवान, अंगणा पिल्लेवान ,विसण्या पिल्लेवान आणि इतर सैनिकांनी प्रयत्न केले.
या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, महिला कार्यकर्त्या तसेच समता सैनिक दलाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण असून “समता, स्वातंत्र्य आणि बंधुता” या मूल्यांचा प्रभावी संदेश देण्यात आला.
0 Response to ""संघर्ष करण्यासाठी आधी संघटित होणे गरजेचे आहे,- रोशन फुले" "
एक टिप्पणी भेजें