-->
राज्यात नव्याने १० वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता.

राज्यात नव्याने १० वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता.


"साप्ताहिक जनता की आवाज"
 वृत्तपत्र प्रतिनिधी 

नागपुर/भंडारा :- राज्यात सध्या ३६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कार्यरत असून नव्याने १० महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे सुमारे एक हजार एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत.

जपानच्या जायका' बँकेकडून सुमारे चार हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळणार असून त्यातून नवीन महाविद्यालये व नर्सिंग शिक्षणाचा विस्तार होणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथील अत्याधुनिक अतिदक्षता कक्षाचे लोकार्पण व केंद्र पुरस्कृत सभागृह व वसतिगृहांच्या कामांचे भूमिपूजन, तसेच सांगली येथील मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार इद्रिस नायकवडी, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ.

मैनाक घोष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, उपअधिष्ठाता डॉ. श्रीकांत अहंकारी, वैद्यकीय उपअधिक्षक डॉ. रूपेश शिंदे आदि उपस्थित होते.

मंत्री मुश्रीफ यावेळी म्हणाले, सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाच्या निधीमधून सात मॉड्युलर ऑपरेशन थिएटर मंजूर करण्यात आले. त्यातील ५ मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचे लोकार्पण करण्यात आले. त्यासाठी राज्य शासनाने सुमारे २० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. याचा गोरगरीब रूग्णांना फायदा होणार आहे. मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ४० बेडचा मॉड्युलर आयसीयु राज्य शासनाच्या निधीतून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मोफत तसेच कमी पैशांमध्ये वैद्यकीय सुविधा देणे शक्य झाले आहे. राज्य शासनाने राज्यात पहिली डिजिटल ब्रेन अंन्जीओग्राफी मशीन मिरज मध्ये मंजूर करून सुरू केली आहे. त्यामुळे गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करणे सोपे झाले आहे.

0 Response to "राज्यात नव्याने १० वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article