विदर्भात उष्णतेची लाट.
गुरुवार, 16 अप्रैल 2026
Comment
• अकोल्यात सर्वाधिक तर रत्नागिरीत सर्वात कमी तापमान.
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्युज नेटवर्क
भंडारा/नागपूर :- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात मोठे बदल होताना पाहायला मिळत आहेत. काही विल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढत आहे, तर काही दिवसांपूवों राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली होती. मात्र आता एप्रिल महिन्याला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील तापमानात कमालीची वाढ होताना दिसत आहे. नागपूर येथील हवामान विभागाने नोंदवलेल्या तापमानानुसार विदर्भात उष्णतेची लाट असून अकोला पुन्हा एकदा सर्वाधिक तापमानाचे शहर ठरले आहे. तर पुण्यात सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अकोला जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. मात्र आता एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून अकोला जिल्ह्याला उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अकोला देशातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे. त्यानंतर आज अकोला शहरातील तापमानाने 44 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. त्यामुळे नागपूर येथील हवामान विभागाने नोंदवलेल्या तापमानानुसार विदर्भात अकोला पुन्हा एकदा सर्वाधिक तापमानाचे शहर ठरले आहे. महत्त्वाचे म्हणजे अकोल्यासह अमरावती 43.8, बुलढाणा 41.6, चंद्रपूर 42.2, गडचिरोली 42.6, गोंदिया 41.1, नागपूर 42.2,
वर्षा 43.5, वाशीम 42.5 आणि यवतमाळ जिल्ह्यात 42.6 अंश
इतर जिल्ह्यात किती तापमान.
यवतमाळ - 42.6, सोलापूर 43.3, सांगली 41.4, महाबळेश्वर- 34.5, सातारा 40.9, नाशिक-39.3, बारामती - 40.4, कोल्हापूर 38.9, नंदूरबार 39.3, पुणे - 39.9, छत्रपती संभाजीनगर 41.4, रत्नागिरी - 34, मुंबई- 34.6, परभणी 42.1, मालेगाव 41.6, जळगाव
-42.5
उन्हाळ्यात अशी घ्या काळजी.
राज्यात तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांनी दुपारी 12 ते 4 या कालावधीत उन्हात घराबाहेर जाणे टाळावे. तापमान अधिक असल्यास बाहेरील शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये आणि ज्वलनशील पदार्थांपासून शक्यतो दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. तहान लागली नसेल तरी थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यावे. अशक्तपणा, स्यूलपणा, डोकेदुखी आणि सतत घाम येत असल्यास उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे असतात. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे आणि लिंबू पाणी, ताक, ओआरएस किंवा कैरीचे पन्हे नियमित घ्यावे. तसेच उन्हात फिरत असताना चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. याशिवाय पशुधनास आणि पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवावे आणि पाळीव प्राण्यांना पुरेसे पिण्याचे पाणी घ्यावे, असे आवाहनही केले आहे.
सेल्सिअसची आज नोंद झाली आहे. तसेच हवामान विभागाने
अकोला तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये 17 एप्रिलपर्यंत
उष्णतेची लाट राहण्याची शक्यता व्यक्त केली असून
नागरिकांना
आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.
0 Response to "विदर्भात उष्णतेची लाट."
एक टिप्पणी भेजें