-->
भारत गॅसची घरपोच सेवा विस्कळीत.

भारत गॅसची घरपोच सेवा विस्कळीत.


    नरेंद्र मेश्राम
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- लाखनी तालुक्या मध्ये असलेल्या भारत गॅस एजन्सीच्या वारंवार तक्रारी येत असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे मागील काही महिन्यापासून गॅस सिलेंडरच्या तुटवडा येत असून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे प्रशासनाचे म्हणणे आहे की गॅस चा तुटवटा नाही असल्यास प्रत्येक तालुक्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी तहसील मधील पुरवठा विभागाच्या निरीक्षण अधिकारी यांच्या सोबत संपर्क करून आपली समस्या सांगावी ती लगेच सोडविण्यात येईल असे म्हटले आहे तक्रारी केल्या असतानी सुद्धा त्या दूर होत नसल्याचे दिसून येत आहे मागील कित्येक दिवसांनी लोकांनी सिलेंडर करता बुकिंग केली आहे परंतु त्यांच्या घरापर्यंत अजून पर्यंत सिलेंडर पोचविण्यात येत नाही असे दिसून येत आहे त्यामुळे लोकांची पहाटे चार वाजेपासून सिलेंडर करिता गॅस एजन्सी पुढे रांगा लागलेल्या दिसतात आणि जर गाडी नाही आली तरी उलट्या पावलांनी परत यावे लागते अशा परिस्थितीत लोकांनी काय करावे असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. गॅस एजन्सीतील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता ते सभ्यतापूर्वक उत्तर देत नाही व वागणूक ही देत नाही. रोशन कापसे निरीक्षण अधिकारी लाखनी लोकांच्या आलेल्या तक्रारी आम्ही सोडविण्याचा प्रयत्न करीत आहोत भारत गॅस एजन्सी चे सेल्स ऑफिसर व संचालक यांच्यासोबत नेहमी वार्तालाप होत असते. नितीन खोत सेल्स ऑफिसर भारत गॅस त्यांच्यासोबत फोनवर संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. भाग्योदय कोचे संचालक भारत गॅस एजन्सी लाखनी : आम्ही घरपोच पोहोचविण्याचा प्रयत्न करीत आहोत पण आम्हाला गॅस सिलेंडरच्या पुरवठा वरूनच कमी होत असल्याने गैरसोय होत आहे. पद्माकर सावरकर स्थानिक ग्राहक लाखनी, आम्ही नोकरीवर असल्याने गॅसच्या रंगेत उभे राहू शकत नाही व आमच्याजवळ पर्याय व्यवस्था नाही त्यामुळे अडचण निर्माण होत आहे गॅस एजन्सीने घरपोच सेवा चालू करावी. रामेश्वर मेश्राम ग्राहक कणेरी तालुका लाखनी, पहिल्यांदा गावात गाडी यायची आता येत नसल्यामुळे पहाटे लाखनीला जाऊन रांगेत लागणे शक्य नाही तरी गेलो गाडी न आल्यामुळे आम्हाला उलट्या पावलांनी वापस यावे लागते माझी बुकिंग मागील आठ दिवसापूर्वी झालेली आहे. आणि रोज रोज जाणे शक्य नाही.

0 Response to "भारत गॅसची घरपोच सेवा विस्कळीत."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article