-->
नांदेड पोलिस यंत्रणा झाली ढिसाळ, वरून रुबाब!. खालचे बे हिसाबी नवाब!.

नांदेड पोलिस यंत्रणा झाली ढिसाळ, वरून रुबाब!. खालचे बे हिसाबी नवाब!.


       विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

नांदेड :- पोलिस झाले आंधळे पोलिस अधिकारी झाले पांगळे,चोर्या,मारामार्या, जुगार, मटका,सट्टा,हे तर रोजचेच होते,वाळु माफियाची तर डाॅन गीरी चालूच आहे,आता तर सर्रास खुन होतं आहेत माफिया डाॅन ची घुसखोरी नांदेड मध्ये बर्याच प्रमाणात वाढली आहे, रोज एक खुन होतं आहेत,गाॅंग वारं होत आहेत सुपारी घेऊन सर्रास मर्डर करतं आहेत ते पण भर रस्त्यावर पोलिसांच्या समक्ष 
पोलिस कर्मचारी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत, आता एक च प्रश्न नागरिकांना, जनतेला पडला आहे आपणं कितपत सुरक्षित आहोत, नांदेड मध्ये जर संशयित लोकांची कसुन चौकशी केली पाहिजे,जर ईमाने इतबारे चौकशी केली तर हत्यार, पिस्तूल,बाळगणारे बरेच मिळतील हत्यारे,चाकू,जंबे, तलवारी बाळगणारे अगोदर ही होते आणि आताही आहे त, परंतू पिस्तूल बाळगणारे बरेच गुंड प्रवृत्तीचे लोक समाजात वावरताना दिसतात,याचा अर्थ एक च पोलिस यंत्रणेचा धाक राहिला नाही आणि त्यातच बाल गून्हेगारी बरिच वाढलेली आहे असे दिसते, जनतेमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे केव्हा कोणाचं काय होणार सांगता येणार नाही कारण थोडीशी बाचाबाची झाली,कि सरळ वार च, आणि तो खल्लास, पोलिस अधिकारी असो का कर्मचारी,कडक कायदा करायला पाहिजे,एल,सी,बी,खात नुसताच धाक, गुन्हेगारांना पाठीशी घालायच, आणि छोट्या मोठ्या गुन्हेगारांना धरपकड करायची, असं काही प्रमाणात चालत असल्याने गुन्हेगारी चे प्रमाण वरचेवर वाढत आहे, असे दिसते आहे,जर का नांदेड मधिल गुन्हेगारी पमाण कमी करायचे असेल तर बाल गून्हेगारी वर कडक नजर ठेवून जेरबंद केले पाहिजे,ह्याच बालगुन्हेगारांना नजर अंदाज केला तेच पुढी चालुन कट्टर गुन्हेगार बनु शकतात आज च्या जनरेशन मध्ये कमी वयाची मुलं चाकू, बरेच इजा पोहोचवणारे हत्यारे बाळगून फिरताणा दिसतं आहे त, नांदेड ची मुंबई होऊ नये, त्यासाठी कायदा सर्वसमाण व कडक करावा, आणि पोलिस यंत्रणा कसुन कामाला लावावी आज वर तर हप्ते खाण्यात जीवन गेले,पुढचे जीवन तरी काही बाहादूरी करण्यात घालावे असे जनतेला वाटत आहे, जेणेकरून पोलिस यंत्रणेवरचा उडालेला विश्वास थोडा तरी वापस येईल, वरिष्ठ पोलीस अधिकारी व जिल्हाधिकारी साहेब यांनी वेळोवेळी लक्ष घालून पोलिस यंत्रणा कितपत विश्वास पुर्ण काम करत आहे,जे संवेदनशील भाग आहे तीथे संशयीत छोट्या मोठ्या गुन्हेगारांच्या कसुन चौकशी करावी म्हणजेच गुन्हेगारांना धडकी भरेल पोलिस यंत्रणेचा धाक निर्माण होईल आणि जनता सुरक्षित राहील,गरिबांनवर अन्याय होत असेल त्यांना कोणी वाली नसतो त्या गरिब कुटूंबातील कोणाला धमकी दिली जाते घरात घुसून मारहाण होते त्यांच्या लेकी बाळी वर बलात्कार होतात तो पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करुन चकरा मारत बसतो त्याचा झिडकारुन मारहाण करुन हाकालण्यात येते आमची चौकशी चालू आहे एवढंच उत्तर मिळतं, त्यामुळे गरिब जनतेचा विश्वास पोलिस यंत्रणेवरचा ऊडाला आहे आणि पोलिस यंत्रणा ची कुचकामी बघून गु्न्हेगारी प्रवृत्ति च्या लोकांना बळ पोहोचत आहे, आणि गुन्हेगारी वरचेवर वाढत जाते जर त्यावर काहि प्रमाणात रोख आनण्यासाठी धडाडीचे काम करुन जनतेचा विश्वास कायम ठेवावा,

0 Response to "नांदेड पोलिस यंत्रणा झाली ढिसाळ, वरून रुबाब!. खालचे बे हिसाबी नवाब!. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article