-->
आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल.

आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल.


• नोकरीचे आमिष दाखवून ६.७५ लाखांनी फसवणूक

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
 अर्जुनी मोरगाव :- एका तरुणाला सरकारी नोकरीचे आमिष दाखवून ६ लाख ७५ हजार रुपयांनी फसवणूक केल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धाबेटेकडी येथे उघडकीस आली. प्रेमचंद एकनाथ कुंभरे (रा. धाबेटेकडी, आदर्श) यांना पंचायत समितीमध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदावर नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले

गेले. आरोपी ललित जनार्दन कुंभरे व सुग्रेश तागडे (रा. बाम्हणी खडकी) यांनी संगनमत करून १ मे २०२४ ते १५ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत वेगवेगळ्या टप्प्यांत रोख स्वरूपात एकूण ६७५००० रुपये स्वीकारले. नोकरी मिळेल या आशेवर फिर्यादीने मोठी रक्कम दिली; मात्र बराच काळ लोटूनही कोणतीही नियुक्ती न झाल्याने संशय निर्माण झाला.

0 Response to "आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article