-->
वीज तारा कोसळल्याने तुमसर-खापा मार्ग ठप्प.

वीज तारा कोसळल्याने तुमसर-खापा मार्ग ठप्प.


        दिगंबर देशभ्रतार
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

तुमसर/खापा :- वादळी वारा आणि पावसाच्या तडाख्यात आंतरराज्य महामार्गावर जिवंत वीज तारा तुटून पडल्याने प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. तुमसर-खापा दरम्यान न्यायखोर यांच्या धर्मकाट्याजवळ ३ एप्रिलच्या रात्री ही धोकादायक घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, काही क्षणांचा उशीर झाला असता तर

मोठा अनर्थ घडला असता, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

घटनेनंतर काही काळ आंतरराज्य महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तुमसर शहरात जाण्यासाठी हा एकमेव प्रमुख मार्ग असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागले.

दरम्यान, वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल होत त्यांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. मात्र, या घटनेने वीज तारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वाहिन्यांची तपासणी केली जाते, असा दावा संबंधित विभागाकडून केला जातो. तरीदेखील राष्ट्रीय महामार्गालगतची वीज तारा वादळी वाऱ्याने तुटून पडणे, ही बाब प्रशासनाच्या दाव्यावरच प्रश्नचिन्ह वारंवार अशा घटना घडत असताना संबंधित विभाग नेमकी कोणती खबरदारी घेत आहे, नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या निष्काळजीपणाची जबाबदारी कोण घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

0 Response to "वीज तारा कोसळल्याने तुमसर-खापा मार्ग ठप्प."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article