आजपासून एसटीचा प्रवास १० टक्के महागणार; सामान्यांना फटका.
बुधवार, 15 अप्रैल 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रवाशांसाठी एसटी प्रवास महाग होणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १५ एप्रिलपासून १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ १५ जूनपर्यंत लागू राहणार असून, यासोबतच प्रत्येक तिकीटावर २ रुपयांचा स्वच्छता अधिभार कायमस्वरूपी आकारण्यात येणार आहे.
एसटी प्रशासनाने बसगाड्या, स्थानके आणि आगारांची स्वच्छता सुधारण्यासाठी कंत्राटी यंत्रणा राबवण्याचा निर्णय
घेतला आहे.' त्यासाठी हा स्वच्छता अधिभार लागू करण्यात येत आहे. ही भाडेवाढ मुख्यतः साध्या बससेवांसाठी लागू असेल, ज्यामध्ये लाल परी, मिडी बस, जलद सेवा आणि रात्रसेवा यांचा समावेश आहे. मात्र शिवशाही, शिवनेरी, जनशताब्दी, हिरकणी, शयनयान आणि ई-बस सेवांना या वाढीतून वगळण्यात आले आहे.
नवीन दरानुसार प्रौढ प्रवाशांसाठी प्रति टप्पा १२ रुपये, तर लहान मुलांसाठी ७ रुपये भाडे निश्चित करण्यात आले आहे. या वाढीमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांना सुमारे ९० ते १०० रुपये अधिक खर्च करावा लागणार आहे. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या नागरिकांच्या
खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. दरम्यान, महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांसारख्या सवलतधारकांना अधिभारातून सूट देण्यात आली आहे.
आवडेल तेथे योजनेतील ५ स्वच्छता रुपयांचा पासधारकांसाठी अधिभार असला, तरी आगाऊ आरक्षण केलेल्या पासवर हा लागू होणार नाही. गर्दीच्या हंगामात तात्पुरती भाडेवाढ एसटी महामंडळाला परवानगी असल्याने दरवर्षी अशी वाढ केली जाते. मात्र मागील वर्षी दिवाळीत झालेली भाडेवाढ नागरिकांच्या विरोधामुळे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष आहे.
0 Response to "आजपासून एसटीचा प्रवास १० टक्के महागणार; सामान्यांना फटका."
एक टिप्पणी भेजें