उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या वेळेत बदल.
गुरुवार, 23 अप्रैल 2026
Comment
• भंडारा जिल्हयातील शाळा सकाळी ७:०० ते १०:०० वाजे सुरु!..
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- सध्या सुरू असलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, शाळांच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी भंडारा यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, वाढत्या तापमानामुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास - टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नवीन वेळापत्रकानुसार, शाळा सकाळच्या सत्रात लवकर सुरू करून लवकर सुट्टी देण्यात येणार आहे. साधारणपणे सकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत शाळा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे दुपारच्या तीव्र
उन्हाचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम कमी होणार आहे. प्रशासनाने सर्व शाळा प्रमुखांना या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच विद्यार्थ्यांनी पिण्याचे पाणी सोबत आणावे, टोपी किंवा छत्रीचा वापर करावा, अशीही सूचना पालकांना
करण्यात आली आहे. पालांदूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली असून, उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी दिलासा देणारा ठरत आहे.
0 Response to " उष्णतेच्या लाटेमुळे शाळांच्या वेळेत बदल."
एक टिप्पणी भेजें