रेती तस्करी करणारा टिप्पर जप्त उपविभागीय पोलिस कार्यालय साकोली पथकाची कारवाई.
गुरुवार, 23 अप्रैल 2026
Comment
नरेन्द्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- जिल्ह्याचे लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तई गावाजवळ उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली चे पथक दुपारचे सुमारास गस्तीवर असताना संसयास्पद टिप्पर रस्त्याने भरधाव वेगाने येताना दिसला त्यामुळे त्या टिप्परला थांबवून रेती वाहतुकीचे पास परवाना संबंधाने विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारचे वैध कागदपत्र मिळून न आल्याने सदर पांढऱ्या रंगाच्या टाटा कंपनीचा टिप्पर क्रमांक एम एच 31 एफ सी 5344 हे टिप्पर दुपारी 2.10 वाजेचे सुमारास पंचासमक्ष जप्त करून टिप्पर मालक चालक प्रशांत मनोहर वाकडोत वय 35 वर्षे राहणार तिरोडा. जिल्हा गोंदिया आणि क्लीनर विक्रम भारत डहाट वय 40 वर्षे राहणार तिरोडा जिल्हा गोंदिया यांचे विरुद्ध पोलीस शिपाई लोकेश पांडुरंग कोटवाल यांच्या फिर्यादीवरून पालांदूर पोलिसांनी अपराध क्रमांक 99/2026 कलम 305 (ई), 3 (5) 49 भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करून टिप्पर किंमत 25 लाख व त्यामध्ये असलेली 6 ब्रास रेती किंमत 36 हजार रुपये असा एकूण 25 लाख 36 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पालांदूर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला.
या प्रकरणाचे तपास पोलीस निरीक्षक सतीश बनसोड यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गिरीधर पेंदोरे करीत आहेत. या चक्क दिवसा ढवळ्या होणाऱ्या कारवाईने परिसरातील रेती तस्करांचे धाबे दणाणले आहेत.
0 Response to "रेती तस्करी करणारा टिप्पर जप्त उपविभागीय पोलिस कार्यालय साकोली पथकाची कारवाई."
एक टिप्पणी भेजें