-->
अपंग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये तब्बल पाचपट वाढ, ९२ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ - तुकाराम मुंढे.

अपंग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये तब्बल पाचपट वाढ, ९२ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ - तुकाराम मुंढे.

सोनु संजीव क्षेत्रे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
मुंबई :- अंपग विद्याथ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये पाचपट वाढ करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. शिष्यवृत्तीच्या रकमेत भरघोस वाढ करण्यात आली असून शिशुवर्ग ते बारावीपर्यंतच्या राज्यातील ९२ हजार ५८१ अंपग विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभमिळणार आहे.

दिव्यांग सक्षमीकरण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या योजना ८ ते ३४ वर्षे जुन्या आहेत. या योजनांमध्ये कालानुरूप बदल करणे आवश्यक असल्याने तसेच दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ मध्ये अपंगांना सामान्य व्यक्तीपेक्षा अधिक लाभ देण्याची तरतूद आहे. अंतर्गत विभागाने शिष्यवृत्ती मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

या निर्णयानुसार अपंगत्वाच्या सर्व २१ प्रकारातील राज्यातील शिशुवर्ग ते आठवीच्या विद्याथ्यर्थ्यांना दरमहा ५०० रुपये, नववी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना दरमहा ८०० रूपये (निवासी), ६०० रूपये (अनिवासी), अकरावी ते बारावीच्या विद्याथ्यर्थ्यांना दरमहा १००० रूपये (निवासी), ८०० रूपये (अनिवासी) शिष्यवृत्ती मिळणार आहे. सदर शिष्यवृत्ती वाढ भरघोस असून या निर्णयाची लागलीच अंमलबजावणी केली जाणार आहे.

बदली पूर्वीचा शेवटचा निर्णय.

तुकाराम मुंढे हे दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या सचिव पदी सप्टेंबर २०२५ मध्ये आले. गेल्या आठ महिन्यात त्यांनी अपंगांसाठी अनेक मोठे निर्णय घेतले. त्यामधला त्यांचा बदली पूर्वीचा शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय शेवटचा ठरला आहे. अपंगांच्या शिष्यवृत्ती मध्ये सोळा वर्षात एक रुपयांची सुद्धा वाढ करण्यात आली नव्हती. यापूर्वी शिष्यवृत्तीची रक्कम दरमहा १०० ते २०० रूपयांच्या दरम्यान होती.

0 Response to "अपंग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये तब्बल पाचपट वाढ, ९२ हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ - तुकाराम मुंढे."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article