खरातचा मुलगा अटकेत, पत्नी फरार..
गुरुवार, 2 अप्रैल 2026
Comment
. अशोक खरात
• शिर्डी जमीन खरेदीत फसवणुकीचा गुना.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
मुंबई :- नाशिक सेक्स स्कँडलमध्ये अडकलेल्या अशोक खरातच्या कुटुंबावर पोलिसांनी फास आवळला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या 'एसआयटी' पथकाने मंगळवारी खरातचा मुलगा हर्षवर्धन याला अटक केली, तर खरातची पत्नी
पीडित कुटुंबांवर आली 'वर्क फ्रॉम होम'ची पाळी
दौगी तांत्रिक खरातचे अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर आता पीडित कुटुंबांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. खरातचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होण्यासोबतच पॉर्न साइट्सपर्यंत पोहोचले आहेत. एका पीडित कुटुंबातील व्यक्तीनुसार, या कारणामुळे ते ऑफिसला जाऊ शकत नाहीत आणि त्यांना 'वर्क फ्रॉम होम' करावे लागत आहे.
कल्पना ही फरार झाली आहे. शिडीतील जमीन खरेदीच्या नावाखाली झालेल्या फसवणुकीच्या प्रकरणात तपास यंत्रणा कल्पना खरातला अटक करण्यासाठी पोहोचल्या होत्या, मात्र त्यापूर्वीच ती पसार झाली. सूत्रांनुसार, पुणे आणि नाशिक पोलिसांची पथके तिचा शोध घेत आहेत. याप्रकरणी कल्पनासह एकूण
पाच जणांवर फसवणूक आणि सावकारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना अटक करून न्यायालयात हजर केले, जिथे त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
आज पोलिस कोठडी संपणार.
अशोक खरात याची पोलिस कोठडी आज, बुधवारी संपणार आहे. पोलिस आता त्याची पत्नी कल्पना खरात आणि दुसरा आरोपी अशोक तांबे यांनाही लवकरच अटक करण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीतील जमिनीव्या खरेदी-विक्रीत मोठी फसवणूक झाली असून, या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींचाही शोध सुरू आहे.
नाशिकमधील डॉक्टर रडारवर खरातने अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते.
मात्र त्यापैकी एकही महिला गरोदर राहिली नाही. या प्रकरणात नाशिकमधील काही स्थानिक डॉक्टराची भूमिका असल्याचा पोलिसांना दाट संशय आहे. या संशयावरून पोलिस नाशिकमधील काही डॉक्टराची चौकशी करू शकतात.
0 Response to "खरातचा मुलगा अटकेत, पत्नी फरार.."
एक टिप्पणी भेजें