परदेश शिष्यवृत्ती योजना सन २०२६-२७ ची प्रक्रिया सुरू.
मंगलवार, 7 अप्रैल 2026
Comment
• अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन.
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
नागपूर/भंडारा :- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रती वर्षी अनुसूचित जाती, प्रवर्गातील ७५ विद्यार्थ्यांना (मुला-मुलीना) परदेशामध्ये अध्ययन करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते.
अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुला-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे (पी.एच.डी.) अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश होय. सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षाची प्रक्रीया सुरू झाली असून विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्यासंबंधीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली असून विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनूसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पी.एच.डी. साठी अद्ययावत (Qx World University Ranking) २०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. त्यापैकी ३०% जागावर मुलींची गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. जर त्याप्रमाणात मुलींचे प्रवेश अर्ज प्राप्त न झाल्यास त्या जागेवर मुलांची गुणवत्तेनुसार निवड करण्याचे अधिकारी निवड समितीला राहतील. तथापि 200 मधील The University of South Wales (UNSW
Sydney), Australia हे विद्यापीठ सदरील योजनेतून वगळण्यात येत आहे. तसेच परदेशातील विद्यापीठ Third Party Sponsor ग्राह्य धरतात किंवा नाही याची खात्री करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची असेल.
विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या
www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील ताज्या घडमोडी या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. व सदर परिपूर्ण भरलेले अर्ज https://fs.maharashtra.gov.in या वेबसाइटवर वाचनीय व सुस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन सादर करुन त्याची सुस्पष्ट प्रिंट, ऑफलाईन नमून्यातील अर्जासोबत समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे या कार्यालयास दिनांक १५ /०५ / २०२६ पर्यंत सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत सादर करावी.
सदर योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी 35 वर्ष व पीएचडीसाठी 40 वर्ष ही कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्तळावरील MD व MS अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी. सदर योजनेसाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन श्री. प्रसाद कुळकर्णी, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नागपूर यांनी केले आहे.
0 Response to "परदेश शिष्यवृत्ती योजना सन २०२६-२७ ची प्रक्रिया सुरू."
एक टिप्पणी भेजें