तुमसर रोड रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी अपघात.
बुधवार, 1 अप्रैल 2026
Comment
• प्रवाशाचा मृत्यू; नागपूर येथील असल्याचा प्राथमीक अंदाज
"साप्ता "जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- आज बुधवार, १ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ७:३०
वाजताच्या सुमारास तुमसर रोड रेल्वे स्टेशनवर एक दुर्दैवी अपघात घडला. अहमदाबादहून हावड्याकडे गाडी क्र.१२८३३ जाणाऱ्या रेल्वेगाडीत चढत असताना एका प्रवाशाचा पाय घसरून तो थेट गाडीखाली पडला. या गंभीर अपघातात संबंधित प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी उपस्थित प्रवासी व रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ मदतीचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
मृत व्यक्ती हा नागपूर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर येत असून, त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपास सुरू असून वृत्त लिहे पर्यंत प्रतिनिधी द्वारा कळले आहे.
0 Response to "तुमसर रोड रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी अपघात."
एक टिप्पणी भेजें