काँग्रेस पर्वेक्षीकाच्या गाडीला धडक.
बुधवार, 1 अप्रैल 2026
Comment
दिगंबर देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/तुमसर :- आज बुधवार (१ एप्रिल) सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास तुमसर येथून नागपूरकडे निघालेल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या गाडीचा अपघात खापा चौकात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाच्या पर्यवेक्षिका संगिता बेनिवाल (राजस्थान) या तुमसर येथे बैठक घेऊन इनोव्हा कारने नागपूरकडे जात होत्या. त्याच वेळी गोंदियाकडे जाणाऱ्या ब्रेझा कारने खापा चौकात त्यांच्या गाडीला धडक दिली.
या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, पर्यवेक्षिका संगिता बेनिवाल यांच्या इनोव्हा गाडीचे नुकसान झाले आहे. अपघाताच्या वेळी गाडीत भंडारा जिल्हा पर्यवेक्षिका कुंदा राऊत, भंडारा जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा जयश्री बोरकर तसेच जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई उपस्थित होते.
0 Response to "काँग्रेस पर्वेक्षीकाच्या गाडीला धडक."
एक टिप्पणी भेजें