-->
उल्हासनगर - ड्रेनेज पाईपलाइन कामात गंभीर त्रुटी, नागरिकांमध्ये नाराजी.

उल्हासनगर - ड्रेनेज पाईपलाइन कामात गंभीर त्रुटी, नागरिकांमध्ये नाराजी.



सोनू संजीव क्षेत्रे 

उल्हासनगर :- महानगरपालिकेच्या मलनिस्सारण विभागामार्फत शहरात नवीन ड्रेनेज पाईपलाइन टाकण्याचे काम सुरू असताना, पॅनल क्रमांक 18 मधील दहा चाळ परिसरात गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. सदर कामामध्ये पाईपलाइन सरळ टाकण्याऐवजी वाकडी पद्धतीने टाकली जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीतून समोर आले.
स्थानिक नागरिकांनी आणि प्रतिनिधींनी कामाची पाहणी केली असता, पाईपलाइन चुकीच्या पद्धतीने बसवली जात असल्याचे स्पष्ट दिसून आले. याबाबत त्वरित संबंधित कर्मचाऱ्यांना काम थांबवण्याचे सांगितले असतानाही काम सुरूच ठेवण्यात येत होते.
या संदर्भात मुकादम रोकडे यांना कळविण्यात आले असता, त्यांनी काम दुरुस्त करून देण्याचे आश्वासन दिले. मात्र, आश्वासनानंतरही प्रत्यक्षात पाईपलाइन सरळ न टाकता वाकडीच टाकली जात असल्याचे पुन्हा निदर्शनास आले.
दरम्यान, सदर काम तात्काळ थांबवून आयुक्त मॅडम यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखवण्यासाठी संपर्क साधण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मुकादम यांनी पाईपलाइन सरळ करून देण्याचे सांगत काम थांबवले असून, JCB मशीन बोलावून काम योग्य पद्धतीने दुरुस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.
या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, अशा निष्काळजीपणावर संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
— ॲड. प्रशांत चंदनशिव

0 Response to "उल्हासनगर - ड्रेनेज पाईपलाइन कामात गंभीर त्रुटी, नागरिकांमध्ये नाराजी."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article