धान खरेदीच्या लिमिट साठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे.
बुधवार, 15 अप्रैल 2026
Comment
• आश्वासनानंतर आंदोलन मागे.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा/लाखांदूर :- गेल्या सहा महिन्यापासून धानाचे पैसे मिळवण्यासाठी आणि आधारभूत केंद्रावर घाण खरेदी व्हावी या मागणीसाठी लाखांदूर शिवाजी चौक येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर, आमदार परिणय फुके, खासदार प्रशांत पडोळे, आमदार नाना पटोले, जिल्हाधिकारी सामन कुमार यांनी भेट देऊन चर्चा केली. धान खरेदीसाठी मुख्यमंत्र्यांसह केंद्रातील मंत्र्यांसोबत चर्चा करून पुढच्या आठवड्यात घाण खरेदीचा मार्ग मोकळा करू असे आश्वासन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
सन 2025 - 26 च्या खरीप हंगामातील धान लिमिट अभावी खरेदी केंद्रावर पडून आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. खतांचे देणे, मजुरी आणि सोसायटीचे कर्ज फेडणे आवश्यक झाली आहे. परिस्थिती इतकी भीषण झाली की धनाचे पैसे न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांनी मुला मुलींचे लग्न पुढे ढकलले आहे. काही शेतकऱ्यांनी तर पैशाअभावी ठरलेले लग्न सुद्धा रद्द केले आहे. परिस्थिती इतकी बिकट झाली की शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे. आता शेतकऱ्यांचा अधिक अंत पाहू नका व शेतकऱ्यांच्या धनाची लिमिट वाढवून ताबडतोब दान खरेदी करा व खरेदी केलेल्या दानाचे पैसे त्वरित द्या असा इसारा शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केला आहे.
आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता बावनकुळे यांनी शेतकऱ्यांची आंदोलनाच्या पेंढार मध्ये येऊन थेट संवाद साधला. व मुख्यमंत्री तसेच केंद्रातील मंत्र्यांसोबत चर्चा करून हा प्रश्न पुढच्या आठवड्यात मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
खासदार प्रशांत पडोळे आमदार नाना पटोले यांनीही शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका मांडत हा प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला.
आंदोलनाचे नेतृत्व माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर सुरेश ब्राह्मणकर, तालुका उभाटा गटाचे अध्यक्ष विनोद ढोरे, प्रहार जन संघटना संघटनेचे तालुकाध्यक्ष काशिनाथ हत्ती मारे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नरेश दिवटे, उत्तम भागडकर यांनी केले. यावेळी गोविंदराव बर्डे , होमराज डोये, मंगेश राऊत, भूमेश्वर महावाडे, रमेश पारधी, लक्ष्मण हत्ती मारे, संदीप कोरे, सदाराम दिघोरे, रामदास राऊत, राष्ट्रपाल लोणारे, संदीप मोडघरे, मनसाराम बोकडे, डॉक्टर शंकर कठाणे, ज्ञानेश्वर राऊत, लोचन पारधी, घनश्याम फुंडे, मनोज तरीकार, प्रभाकर राऊत, रमेश शिलार, व अनेक सर्वपक्षीय पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "धान खरेदीच्या लिमिट साठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे."
एक टिप्पणी भेजें