डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गाव कुसाबाहेरील माणसाला गावात बसविले -पत्रकार संजीव भांबोरे.
बुधवार, 15 अप्रैल 2026
Comment
•जयंतीनिमित्त ईटान येथे मार्गदर्शन
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
भंडारा :- लाखांदूर तालुक्यातील इटान येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त १५ एप्रिल ला मार्गदर्शन करताना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस म्हणाले की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः अपमानाचे चटके सहन करून गावकुसा बाहेरील माणसाला गावात बसविले. स्वतः वर्गाच्या बाहेर बसून या देशाला संविधान दिले. ओबीसीला घटनेच्या ३४० व्या कलमानुसार ५२ टक्के आरक्षण दिले. ते खऱ्या अर्थाने ओबीसीचे नेते होते. परंतु ओबीसी समाज बाबासाहेब मानायला तयार नाही. कारण त्यांची मानसिकता संकुचित विचाराची आहे. आपला अधिकार मिळविण्याकरिता संघटित होत नाही.त्यामुळे ओबीसी समाज विकासापासून दूर आहे. असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष पदावरून मार्गदर्शन करताना समता सैनिक दलाचे लाखांदूर तालुका अध्यक्ष रोशन फुले म्हणाले की, आपण महापुरुषांच्या विचारांची जयंती साजरी करीत आहोत. विचार कधी मरत नसतात . विचारांचा प्रचार प्रसार करणे आपली काळाची गरज आहे. परंतु आपण महापुरुषांचे विचार ऐकण्यापेक्षा नाच गाण्याला जास्त महत्त्व देतो त्यामुळे चळवळ कशी जिवंत राहील असा प्रश्न उपस्थित केला. यावेळी पूज्य भदंत राहुल बोधी आरमोरी यांनी धम्मदेशना सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना दिली.
0 Response to "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गाव कुसाबाहेरील माणसाला गावात बसविले -पत्रकार संजीव भांबोरे. "
एक टिप्पणी भेजें