-->
शिवसेनेची तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक.

शिवसेनेची तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक.


• पक्षबांधणीसाठी एसआयआर मॉडेलवर भर

        दिगंबर देशभ्रतार
 "साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा/तुमसर :- शिवसेना (शिंदे गट) भंडारा-गोंदिया जिल्हा संपर्क प्रमुखपदी विलास चावरी यांची नियुक्ती झाल्यानंतर, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवार दि. १३ एप्रिल रोजी तुमसर येथे विधानसभा मतदारसंघाची पहिली महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणी आणि 'बूथ' स्तरावरील नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

अतिथी गृह, तुमसर येथे सकाळी ११ वाजता आयोजित या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांची विशेष उपस्थिती होती. बैठकीत प्रामुख्याने जिल्हाप्रमुखांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना

संकल्पनेचे महत्त्व पटवून दिले. ध्येयधोरणे पक्षाची तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हे मॉडेल अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रत्येक मतदान केंद्रावर सक्षम 'बुथ लेव्हल एजंट' नियुक्त

करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक प्रक्रियेत बी. एल.ए. ची भूमिका निर्णायक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या बैठकीचे औचित्य साधून मोहाडी तालुक्यातील काही सक्रिय शिवसैनिकांना पक्षाच्या

महत्त्वाच्या पदांवर नियुक्त करण्यात आले. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाने दिलेला आदेश तंतोतंत पाळण्याची आणि संघटना वाढीसाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली. यावेळी तुमसर-मोहाडी उचिबगले, उपजिल्हाप्रमुख विकास मदनकर, जिल्हा संघटक नितीन धकाते, युवासेना जिल्हाप्रमुख नितीन सेलोकर, नगरसेविका वैशाली हिंगणे, कृ.उ.बा. स. संचालक भोजराज वंजारी, तालुकाप्रमुख अनिल ढुंगकर, शहरप्रमुख भूषण बुधे, युवासेना शहरप्रमुख ललित ठाकरे, मोहाडी उपजिल्हाप्रमुख बाबूलाल बोंदरे, तालुकाप्रमुख अनिल सार्वे, डॉ. रहांगडाले आणि योगेश हिंगणे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

0 Response to "शिवसेनेची तुमसर-मोहाडी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article