लाखनी तालुक्यात रस्ते बांधकामांत अनियमितता.
शनिवार, 4 अप्रैल 2026
Comment
• माहिती फलकांचा अभाव, अधिकारी गैरहजर
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
लाखनी :- तालुक्याच्या ग्रामीण परिसरात पायाभूत सुविधांच्या पूर्ततेकरिता शासन प्रयत्नशील असून याकरता अनेक योजनांच्या माध्यमातून आवश्यक त्या निधीची पूर्तताही केली जाते. परंतु क्रियान्वयन यंत्रणेतील काही गैरव्यवहारामुळे शासनाची उद्देशपूर्ती होत नाही. याचा प्रत्यय लाखनी तालुकाभर सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीट व डांबरीकरण रस्ते कामांत होत आहे. येथील रस्ता कामांतील गंभीर अनियमितता उघड झाली आहे. कामात
पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचे चित्र समोर येत आहे.
नियमानुसार कोणतेही रस्ते काम सुरू असताना त्या ठिकाणी दर्शनी
भागावर माहितीफलक (बोर्ड) लावणे बंधनकारक असते; मात्र तालुकाभर बहुतांश ठिकाणी असे फलक दिसून येत नसल्याने कामांची माहिती नागरिकांपासून
दडवली जात असल्याचा आरोप होत आहे. या माहितीफलकावर कामाचे नाव, योजनेचे नाव, अंदाजपत्रकीय रक्कम, कामाचे स्वरूप (नवीन बांधकाम, दर्जोन्नती की दुरुस्ती?) याबाबत स्पष्ट माहिती असणे आवश्यक असते. परंतु ही मूलभूत नियमावलीच पाळली जात नसल्याने संबंधीत कंत्राटदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
सुरक्षा उपकरणांचा अभाव
तालुक्यात सुरू असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या शासकीय बांधकामांवर सिमेंट, लोहा, गिट्टी इत्यादी साहित्य तथा मिक्सर मशीनचा वापर करण्यात येत असल्यामुळे हे काम धोकादायक श्रेणीमध्ये येते. यामुळे शारीरिक इजा
कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी.
काही ठिकाणी स्थानिकांच्या मते, जर कामाच्या सुरुवातीपासूनच योग्य देखरेख, पारदर्शकता आणि नियमांचे पालन झाले असते, तर ही परिस्थिती उद्भवली नसती. मात्र सध्या सुरू असलेला ढिसाळ कारभार आणि जबाबदारीचा अभाव यामुळे कोट्यवधी रुपयांचा निधी वाया जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेऊन सर्व रस्ते कामांवर माहितीफलक अनिवार्य करावेत, संबंधित अधिकाऱ्यांची नियमित उपस्थिती सुनिश्चित करावी आणि निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
किंवा दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. त्यासाठी कार्यरत मजुरांना सुरक्षा उपकरणे जसे पायात बूट, हातमोजे, टोप, चष्मा तसेच मजुरांचा वैयक्तीक विमा काढणे अत्यावश्यक असते. पण या सिमेंट काँक्रिट रस्ता
बांधकामावरील मजुरांना यापैकी एकही सुरक्षा उपकरणे पुरविली जात नसल्याचे वास्तव आहे. कित्येक ठिकाणी संबंधित कंत्राटदाराने कामावरील मजुरांचा विमाही काढला नसल्याची खात्रीलायक माहिती आहे.
0 Response to "लाखनी तालुक्यात रस्ते बांधकामांत अनियमितता."
एक टिप्पणी भेजें